शिक्रापुरात हेल्मेट नसल्यास थेट पोलिसांवर कारवाई
पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांचा निर्णय
शिरूर ( प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी दुचाकीहून पोलीस स्टेशन मध्ये येत असताना हेल्मेट नसल्यास सदर कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा अनोखा निर्णय पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी घेतला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता देखील गरजेची असल्याने पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर येताना, जाताना तसेच परिसरात वावरत असताना दुचाकीहून प्रवास करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी घेतला, याबाबत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना देखील देण्यात आल्या असून पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील सदर सूचनेचे पालन करत दुचाकी वापरणारे सर्वच कर्मचारी हेल्मेट वापरु लागल्याचे दिसून आले, तर पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण माहिती घेऊन हेल्मेट न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस निरीक्षकांनी दिल्याने कर्मचाऱ्यांनी देखील चांगलाच धसका घेतल्याचे दिसून आले असून पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या या अनोख्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
स्वतंत्र चौकट १ –
सध्या शिक्रापूर हद्दीतील वाहतुकीची अवस्था सर्वच कार्चारी पाहता नागरिकांना हेल्मेट वापराबाबत जागरुक करण्यासाठी तसेच दुचाकी वापरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या हेतूने सदर निर्णय घेतला असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.

