शिरूर शहरातील सरदार पेठ मारुती येथील वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा नागरिकांचा इशारा
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील मारुती आळी व सरदार पेठ येथे होणारा विद्युत पुरवठा कमी व्होल्टेज होत असल्याने अनेक घरातील उपकरणे खराब झाले असून त्वरित या ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सरदार पेठ व मारूती आळी मधील नागरिकांनी करून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन केला आहे.
निवेदन शिरूर येथील वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंता बारवकर यांना देण्यात आले आहे
यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया,नगरसेवक राजेंद्र लोळगे,डॉ संतोष पोटे, व्यापारी संघटनेचे वैभव खाबिया,भाजपा माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे,विनीत बोरा, सागर चव्हाण शेरसिंग परदेशी आदेश बोरा,व मारुती आळी व सरदार पेठ मधील व्यापारी वर्ग सह नागरिक उपस्थित होते .
या निवेदनात म्हटले आहे कि आम्ही सर्व रहीवाशांच्या वतीने तक्रार अर्ज लिहीत आहोत, गेल्या सहा महीन्यापासुन बाजार पेठेत अनियमीत ३ फेजचा कमी व्होल्टेजचा विज पुरवाठा होत आहे त्यामुळे जास्त व्होल्टेजचे उपकरण बंद होत आहेत उदा. त्या भागातील हॉस्पिटल लिफ्ट, व्यावसायिक लिफ्ट, ३ फेज वरती चालणारी मोटार व बाजारपेठेतील उपकरणे बंद होत असून वारंवार वीज जात असून यामुळे अनेक समस्या येत आहे, या ठिकाणी 200 च्या जागी 400 चा टान्सफॉर्मर बसवण्यात यावा ही विनंती केली
आपल्याकडे वारंवार सुचना व तक्रार देऊन व्यापारी वर्गाना आज पण कमी व्होल्टेजच्या पुरवल्यामुळे गैरसोय होत आहे तरी आपण कृपा करून स्थळ पाहणी करून समस्यांची गंभीरता लक्ष्यात घेऊन बाजारपेठेतील अडचण दूर करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे

