शिरूरमध्ये आनंद पतसंस्था आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: ८ जणांना अटक; MPID कायद्यांतर्गत मोठी कारवाई

9 Star News
0

 

शिरूरमध्ये आनंद पतसंस्था आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: ८ जणांना अटक; MPID कायद्यांतर्गत मोठी कारवाई


शिरूर (प्रतिनिधी):

शिरूर शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ठेवीदारांच्या पैशांचा अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आणि व्यक्तींचा समावेश आहे.

       या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी फरार असून, केवळ संचालक राहिल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मोठा मासा पोलिसांच्या जाळ्यात कधी येणार अशी चर्चा शिरूर शहरात आहे.

      याप्रकरणी संजयकुमार सखाराम पुंडे (वय 56 वर्ष, व्दितीय अपर विशेष लेखापरीक्षक वर्ग-2 सहकारी संस्था पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

      याप्रकरणी विनयकुमार वसंतलाल संघवी (वय ४८, रा. आनंद सोसायटी, शिरूर), भरतकुमार रतनलाल चोरडीया (वय ५६, रा. , शिरूर), मनोज पोपटराव मुसुडगे (वय ५०, रा. , शिरूर) वल्लभ मनसुखलाल साखला (वय ३८, रा., शिरूर), सुरेशकुमार शांतीलाल बोरा (वय ७१, रा, शिरूर)

कांतीलाल बाळासो होळकर (वय ६५, रा. सादलगाव, ता. शिरूर) दोन महिला यांना अटक करण्यात आली आहे.

        शिरूर येथे आनंद नागरिक सहकारी पतसंस्था यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी संजयकुमार सखाराम पुंडे (वय 56 वर्ष, व्दितीय अपर विशेष लेखापरीक्षक वर्ग-2 सहकारी संस्था पुणे) यांनी वरील आरोपींचा गुन्हयात सहभाग असल्याबाबत पुरवणी जबाब दिलेला असुन 

 या गुन्ह्यात आरोपीचा सहभाग तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. 

या कारवाईमुळे शिरूर तालुक्यात आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून,  

आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०९ (लोकसेवाद्वारे किंवा बँकर्सद्वारे विश्वासघात), ४६७, ४६८, ४७१ (बनावट कागदपत्रे तयार करणे), १२० (ब) (गुन्हेगारी कट रचणे) आणि ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ (MPID Act) मधील कलम ३ व ४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

"पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!