शिरूर सरदारपेठ येथील अमोल ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून सोन्या चांदीचा १ कोटी ३८ लाखाचा ऐवज लांबवला
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरातील सरदार पेठ व हलवाई चौक यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या सोन्याचे पिढीवर पहाटे चार ते साडेचार दरम्यान चार ते पाच जणांच्या टोळीने जबरी चोरी करून १ कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा सोने-चांदीच्या ऐवज चोरून नेला आहे.
ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बर बाजारपेठेत झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत दुकानाचे मालक वैभव पुरूषोत्तम जोशी (वय 45 वर्षे, व्यवसाय सराफ दुकान, रा. सरदार पेठ, मोतीभवन शिरूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी चार अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर शहरातील सरदार पेठ येथील अमोल ज्वेलर्स या सोन्याच्या पिढीवर आज दिनांक २४ पहाटे चार ते साडेचार दरम्यान चारचाकी कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी दुकानाचे शटर अत्याधुनिक कटरने तोडून व उचकटून दुकानाची आतील सुरक्षा ग्रील व काउंटर ची काच फोडून दुकानांमध्ये प्रवेश केला. दुकानातील चांदीचे पायातील पैंजन, तोडे, वाळे, पैंजण, चैन, हत्ती मोरा असा ७० किलो चांदीचा ऐवज किंमत ६० लाख ३० हजार रुपये किमतीचे ,चांदीचे जोडवे वजन ७ किलो सात लाख रुपये ,सोन्याचे कर्नफुले, वाटया, मनी, चैन व अंगठी ४६ ग्रॅम वजन किंमत चार लाख चौदा हजार रुपये, सोन्याचे गंठण, चैन, राणीहार, टेंपलहार, टेंपल गंठण, शॉर्टर गंठण, लेडीज़ अंगठी, बचकन अंगठी ७१४ ग्रॅम वजनाचे किंमत ६४ लाख २६ हजार रुपये असा एकूण १ कोटी ३८ लाख ४० हजाराचा सोन्या चांदीचा ऐवज चोरून नेला आहे.
. दरम्यान स्थानिक नागरिक यांना चोरीची चाहूल लागल्याने व काहीतरी खाली गडबड असल्याचे लक्षात आले आणि आरडाओरडा केल्याने व दुकानदार वैभव पुरुषोत्तम जोशी यांना फोन करून सांगितल्याने समोरच राहणारे जोशी यांनी आपल्या गॅलरीमधून सर्व घटना पाहिली व आवाज देऊन आरडा ओरडा केल्याने चार चाकी गाडीमध्ये बसून दरोडेखोर पळून गेले.
चोरी करण्याच्या अगोदर चोरट्यांनी या भागात असणारे त्यांच्या दुकानासमोर लावलेला कॅमेरा कॅमेरा तोडला तर सायरन च्या वायरी कट केल्या व समोरच्या रस्त्यापलीकडे लावलेल्या इमारतीवरील दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेरे वाकडे केले व त्यांच्या वायरी तोडल्या तर बाजूच्या दुकानांच्या व इतर दुकानांचे कॅमेरे बांबूच्या साह्ने वळवली आहे .
घटनेची माहिती मिळतात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , शिरूर पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळाला भेट दिली व पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक शिरूर पोलीस स्टेशनचे पथक रांजणगाव पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. शिरूर पोलीस स्टेशन तपास पथक, पुणे ग्रामीण गुन्हेअन्वेषण विभागाची तपास पथक तपासासाठी रवाना झाली आहे. तसेच फॉरेन्सिक लॅबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिर्के यांनी ही भेट दिली. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहे.