शिरूर शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी भाजपा महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रिया बिरादार उपोषण सुरू

9 Star News
0

 शिरूर शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी भाजपा महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रिया बिरादार उपोषण सुरू 


शिरूर , प्रतिनिधी 

   शिरूर शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व्हावे व त्यासाठीच्या  आवश्यक जागेचा परिपूर्ण प्रस्ताव महसूल विभागाने शासनाकडे सादर करावा यास विविध मागण्यासाठी भाजपा महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी आज पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

        शिरूर शहरात उपजिल्हा रुग्णालयासह विविध मूलभूत मागण्यांसाठी सत्तेतीलच प्रमुख भाजपा पक्षाच्या महिला शहराध्यक्षांना उपोषणास बसण्याची वेळ आली आहे.

    आज या आमरण उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पष्पहार घालून झाली.

    यावेळी भाजपा उद्योग आघाडीचे संजय पाचंगे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, काँग्रेसचे सुरेश थोरात, भाजपा महिला आघाडीचे जिल्हा सचिव वर्षाताई काळे, पंचायत समितीच्या सभापती स्वाती विठ्ठल घावटे,पंचायत समिती सदस्य दीपक पवार,

सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्षा श्रुतिका झांबरे, आदिशक्तीच्या शशिकला काळे, आधार छाया फाउंडेशनच्या सविता बोरुडे,वात्सल्य सिंधू फाउंडेशन उषा वाखारे, प्रीती बनसोडे, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा ज्योती हांडे, कल्पना पुंडे,हिराबाई अडसूळ, भारती शहाणे, जनाबाई मल्लाव, सुजाता पाटील, निलू शर्मा, अश्विनी नरवडे आदींनी भेट दिली.    

       यावेळी उपोषणकर्त्या भाजपा महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी 

शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक जागेचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा ही आंदोलनाची प्रमुख मागणी असून, या रुग्णालयाच्या जागे संदर्भात चुकीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, शहर व तालुक्यात अधिकृत शासकीय आधार केंद्रे सुरू करावीत .मागणीही करण्यात आली आहे. सध्या कार्यरत सीएससी केंद्रांवरील सेवा शुल्काबाबत पारदर्शकता राखावी, तसेच शासनाने निश्चित केलेले शुल्क फलक दर्शनी भागात लावण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. बंद असलेल्या आधार केंद्रांबाबत जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रशासनाने या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र इशारा बिरादार यांनी दिला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!