शिरूर सरदारपेठ येथील अमोल ज्वेलर्स दुकानावर दरोडा सोन्या चांदीचा लाखोंचा ऐवज चोरी
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरातील सरदार पेठ व हलवाई चौक यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या सोन्याचे पिढीवर पहाटे चार ते साडेचार दरम्यान चार ते पाच जणांच्या टोळीने दरोडा टाकून लाखो रुपयांची सोने-चांदीच्या ऐवज चोरून नेला आहे.
ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
शिरूर शहरातील सरदार पेठ येथील अमोल ज्वेलर्स या सोन्याच्या पिढीवर पहाटे चारच्या दरम्यान चार चाकी कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी दुकानाचे शटर अत्याधुनिक कटरने तोडून व उचकटून दुकानाची आतील सुरक्षा ग्रील व काउंटर ची काच फोडून दुकानांमध्ये प्रवेश केला. दुकानांमध्ये असणारी लाखो रुपयांची चांदीचे पैंजण व चांदीचे दागिने तसेच सोन्याचा ऐवज असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला आहे. या तेवढी दरम्यान स्थानिक नागरिक यांना चोरीची चाहूल लागल्याने व काहीतरी खाली गडबड असल्याचे लक्षात आले आणि आरडाओरडा केल्याने व दुकानदार वैभव पुरुषोत्तम जोशी यांना फोन करून सांगितल्याने समोरच राहणारे जोशी यांनी आपल्या गॅलरीमधून सर्व घटना पाहिली व आवाज देऊन आरडा ओरडा केल्याने चार चाकी गाडीमध्ये बसून दरोडेखोर पळून गेले.
चोरी करण्याच्या अगोदर चोरट्यांनी या भागात असणारे त्यांच्या दुकानासमोर लावलेला कॅमेरा कॅमेरा तोडला तर सायरन च्या वायरी कट केल्या व समोरच्या रस्त्यापलीकडे लावलेल्या इमारतीवरील दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेरे वाकडे केले व त्यांच्या वायरी तोडल्या तर बाजूच्या दुकानांच्या व इतर दुकानांचे कॅमेरे बांबूच्या साह्ने वळवली आहे .
घटनेची माहिती मिळतात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , शिरूर पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळाला भेट दिली व पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक शिरूर पोलीस स्टेशनचे पथक रांजणगाव पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. शिरूर पोलीस स्टेशन तपास पथक, पुणे ग्रामीण गुन्हेअन्वेषण विभागाची तपास पथक तपासासाठी रवाना झाली आहे.