नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार व हत्येच्या घटनेचा शिरूरमध्ये निषेध आरोपीला फाशी देण्याची नागरिकांची मागणी

9 Star News
0

 नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार व हत्येच्या घटनेचा शिरूरमध्ये निषेध आरोपीला फाशी देण्याची नागरिकांची मागणी


शिरूर (प्रतिनिधी)

      भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका ४ वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेचा निषेध शिरूर शहरवासी यांच्या वतीने करण्यात आला असून आरोपीला फाशीचे शिक्षा व्हावी व यासाठी कडक कायदा करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.

      शिरूरमधील संतप्त नागरिकांनी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व नायब तहसीलदार प्रकाश मुसळे यांना निवेदन देऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

       पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये ३ मे २०२६ रोजी घडलेल्या या अमानवीय घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका निरागस बालिकेसोबत घडलेल्या या कृत्यामुळे समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिरूरकरांनी एकत्र येत प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत.यावेळी दिलेल्या निवेदनात खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात. शहरात व परिसरात पोलीस गस्त वाढवून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

      यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे,उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेविका संगीता मल्लाव,आयशा सय्यद, योगेश जामदार, डॉ.संतोष पोटे,अध्यक्ष शशिकला काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहराध्यक्ष श्रुतिका,झांबरे, तज्ञिका कर्डिले, कार्यकर्ते उषा वाखारेबाळासाहेब घाडगे,प्रितेश फुलडाळे, अश्विनी नरवडे, संतोष शिंदे, भाऊसाहेब जाधव, सुदाम नेवसे, सुदर्शन दरेकर, यशराज नरवडे, अर्जुन बढे, रोशनी जोडे, सविता बोरुडे, प्रिती बनसोडे कल्पना ईवरे, रिना जाधव, अरुणा चव्हाण,ज्योती गायकवाड, नेहा नरवडे, मायाताई जाधव, भारतीताई जाधव,दिपाली जाधव,जनाबाई मल्लाव, पुनिका तांबोळी, तडविका कांगले, विशाल जोगदंड, अक्षय भवर उपस्थित होते.

 या प्रकरणात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पीडितेला न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!