शिरुरमध्ये तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

9 Star News
0

 शिरुरमध्ये तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न 




शिरूर ( प्रतिनिधी ) 

     शिरुर शहरात मंदिरात दर्शनासाठी आलेल्या इसमाचा चक्क कोयत्याने वार करुन खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अमोल काळूराम गायकवाड याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    याबाबत संतोष गजानन गायकवाड (वय ३६ वर्षे सध्या रा. चाकण ता. खेड जि. पुणे मूळ रा. कैकाडी आळी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अमोल काळूराम गायकवाड( रा. कैकाडी आळी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्या सह दोन युवकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला 

                      शिरुर शहरातील रेणुका माता मंदिरात संतोष गायकवाड हे दर्शनासाठी आलेले असताना अमोल गायकवाड व त्याचे दोन मित्र सदर ठिकाणी आले, दरम्यान अमोल याने संतोष यास तू माझ्या वडिलांना का बोलतो असे म्हणून त्याच्याजवळील कोयत्याने संतोष च्या हातावर वार केला, यावेळी संतोष जीव वाचवण्यासाठी मंदिराच्या खाली पळू लागले असताना अमोल याने त्याच्या जवळील कोयत्याने संतोषच्या मानेवर वार केला, मात्र सदर ठिकणी नागरिक गोळा झाल्याने अमोल व त्याचे मित्र पळून गेले, याबाबत संतोष गजानन गायकवाड वय ३६ वर्षे सध्या रा. चाकण ता. खेड जि. पुणे मूळ रा. कैकाडी आळी शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अमोल काळूराम गायकवाड रा. कैकाडी आळी शिरुर ता. शिरुर जि. पुणे याच्या सह दोन युवकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!