शिरूर बायपासवर पोलिसांचा छापा; १ लाखाचे 'एमडी' ड्रग्ज जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक
शिरूर (प्रतिनिधी)
शिरूर बायपास येथील इम्पायर पान विल्हा' पान टपरीच्या आडोशाला अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीणच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ATB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४ हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम 'मॅफेड्रॉन' (MD) जप्त केले असून, याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सहाय्यक फौजदार एम.व्हि.गायकवाड (अंमली पदार्थ विरोधी पथक पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी साहील संदीप करंजुले (वय २०, रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर) आणि ओंकार संजय धावडे (रा. रामलिंग रोड, शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे
मंगळवारी (७ एप्रिल) रात्री अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक फौजदार एम. व्ही. गायकवाड आणि त्यांचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत होते. यावेळी साहील करंजुले हा शिरूर बायपासवरील 'इम्पायर पान विल्हा' टपरीमध्ये एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. याबाबत शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना फोनवर सांगून
या माहितीची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शिरूर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक करांडे आणि त्यांच्या पथकाला सोबत घेऊन सापळा रचला मध्यरात्री १२:३० च्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, साहिल करंजुले आरोपींकडे चौकशी करून त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील पॅंटीच्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचा पावडर स्वरूपातील अंमली पदार्थ मिळून आला. वजन केले असता तो १३ ग्रॅम भरला. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत प्रति ग्रॅम ८ हजार रुपये असून एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हा माल त्याने ओंकार धावडे याच्याकडून विक्री करिता घेतला असल्याचे चौकशीत सांगितले.
आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायदा १९८५ च्या कलम ८ (क) आणि २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली एटीबीचे ए. एस. आय. गायकवाड, व्हि.एस गव्हाणे,, कदम, जाधव, शेख, शिंदे, मुळीक, आणि शिरूर पोलीस ठाण्यातील सपोनि दीपक करांडे, पोसई हनुमंत नकाते, सागर शेळके व पोलिस सचिन भोई कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.

