शिरूर शहरात 18 महिने वयाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला मुलगा गंभीर ... शिरूर नगरपरिषदेने ठोस उपाययोजना करण्याची गरज...

9 Star News
0

शिरूर शहरात 18 महिने वयाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला मुलगा गंभीर ... शिरूर नगरपरिषदेने ठोस उपाययोजना करण्याची गरज...

 


शिरूर प्रतिनिधी 

       शिरूर अंडे बाजार येथे तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी अठरा महिन्याच्या मुलावर हल्ला करून त्याचे लचके तोडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून यामुळे शिरूर शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून शिरूर नगरपरिषद यावर उपाययोजना करणार का ? असा सवाल नागरिकांमधून होत आहे.

      फैजल शफीक मलिक (वय १८ महिने रा. अंडे बाजार भाजी बाजार, शिरूर) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे.

        आज दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याचा दरम्यान मुलगा घराच्या बाहेर खेळत असताना चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला यामध्ये त्याच्या पायाचे व डोक्याची लटके या कुत्र्यांनी तोडले असून हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. नागरिकांनी आरडाओरडा केला तरीही ही बेभान झालेली भटकी कुत्री या लहानग्याला सोडायला तयार नव्हती अखेर नागरिकांनी काठ्या मारून या कुत्र्यांना बाजूला केले. यावेळेस मुलाच्या डोक्यावर मांडीवर गुप्तांग जवळ कुत्र्यांनी चावा घेतले ते दिसून आले.

       जखमी फैजल याला शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार उपचारासाठी दाखल केले असता या ठिकाणी दंडात इंजेक्शन दिले असून, जखमी देण्यात येणार इंजेक्शन ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करून हा दवाखाना बंद करावा अशी मागणी केली आहे. 

        यानंतर या फैजल् यास पुढील उपचारासाठी नगर सिविल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून तेथे त्यावर उपचार सुरू असून त्याला दोन दिवस ऍडमिट करण्याची डॉक्टरांनी सांगितले आहे. 


        शिरूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. अनेक नागरिकांना ही कुत्री चावत असून याकडे मात्र लक्ष देण्यास शिरूर नगरपरिषदेत वेळ नसल्याचे दिसून येत आहे. या मोकाट कुत्र्यांसाठी शिरूर नगर परिषदेने कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.

           शिरूर शहरातील अनेक महिला पुरुष लहानगे यांना या मोकाट कुत्र्यांमुळे जखमी झाले आहे. अनेक वेळा नगर परिषदेत सांगूनही कुठली उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.

              याच भागात आजपर्यंत चार ते पाच जण या मोकाट कुत्र्यांनी जखमी केले असून, दोन शेळया ही या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. याबाबत नगरपरिषद म्हणावासे लक्ष देत नाही. यावर ठोस उपाययोजना झाली नाही तर आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

     सचिन गरुडे, स्थानिक नागरिक 




        

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!