नागरगावात महिलेचे दागिने घेऊन पाळणाऱ्याला लोकांनी पकडले

9 Star News
0

 नागरगावात महिलेचे दागिने घेऊन पाळणाऱ्याला लोकांनी पकडले  


शिरूर 
(  प्रतिनिधी ) नागरगाव ता. शिरुर येथे महिला शेतात असताना सदर ठिकाणी आलेला युवक महिलेचा मोबाईल व महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून पळून जात असताना नागरिकांनी परप्रांतीय युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून नितेश कुमार यादव असे सदर आरोपीचे नाव आहे.
         शिरूर तालुक्यात अनेक दिवसांपासून किराणामाल दुकानावरील महिला, हॉटेलवर असणाऱ्या महिला यांना साखळी चोरांनी लक्ष केले होते त्यात नागरगाव येथे परप्रांतीय तरुण मंगळसूत्र पकडताना पकडला गेल्याने हे परप्रांतीय राकेट पाळत ठेवून अशा चोऱ्या करत असल्याची शक्यता आहे.       
             नागरगाव ता. शिरुर येथील आशा पाटोळे या गावातील पेट्रोल पंप मागे त्यांच्या शेतात काम करत असताना एक युवक सदर ठिकाणी आला त्याने आशा यांच्या हातातील मोबाईल व गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावले, दरम्यान महिला आरडाओरडा करु लागली असता जवळील नागरिकांनी पाठलाग करत सदर युवकाला जागेवर पकडत पोलिसांना याबाबतची माहिती देत 
युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
     याबाबत आशा पोपट पाटोळे( वय ३५ वर्षे रा. नागरगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी नितेश कुमार यादव (सध्या रा. रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. पुराणी साहेब गंज ता. जीरवाबाडी जि. साहेबगंज झारखंड )याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत हे करत आहे.
     

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!