शिरुरमध्ये चक्क अल्पवयीन युवतीवर अत्याचार..अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी
( प्रतिनिधी ) शिरुर ता. शिरुर येथील अल्पवयीन युवतीवर एका युवकाने वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अत्याचाराचा प्रकार उघड झाल्याने सदर घटनेबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन युवकावर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
शिरुर येथील अल्पवयीन युवतीची ओळख गावातील युवकासोबत झाल्यानंतर सदर युवकाने युवतीशी ओळख वाढवून युवतीला प्रेमाचे आमिष देत युवतीला घरी बोलावून घेत युवतीवर वारंवार अत्याचार केला, त्यांनतर काही दिवसांनी युवतीला वारंवार पोटात दुखू लागल्याने युवतीच्या कुटुंबीयांनी युवतीला रुग्णालयात घेऊन जात उपचार व तपासणी केली असता युवतीच्या आई वडिलांच्या पायाखालील वाळू सरकली, मुलीने धक्कादायक माहिती युवतीच्या पालकांना दिली, त्यांनतर युवतीच्या पालकांनी पोलिसांना माहिती देत युवतीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगत सदर प्रकाराबाबत पिडीत युवतीच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अल्पवयीन युवक रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते हे करत आहे.


