शिरुर पाषाणमळा मधून चक्क शेतकऱ्याच्या चार गाई चोरी

9 Star News
0

 शिरुर पाषाणमळा मधून चक्क शेतकऱ्याच्या चार गाई चोरी


शिरूर (  प्रतिनिधी )

 शिरुर येथील पाषाण मळा येथून रात्रीच्या सुमारास दोन शेतकऱ्यांच्या शेतातील चार गाई चोरीला गेल्याची घटना समोर आली असून याबाबत शिरुर पोलिसांत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                              शिरुर येथील पाषाण मळा येथील अविनाश घावटे यांनी त्यांच्या घराजवळ गोठ्यात गाई पाळलेल्या असून सायंकाळच्या सुमारास गोठ्यातील जनावरांना चारापाणी करुन झोपले होते, सकाळच्या सुंरास अविनाश हे उठून गोठ्यात गेले असता त्यांना दोन गाई जागेवर नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी आजूबाजूला गाईचा शोध घेतला असता त्यांना गाई मिळून आल्या नाही, तर त्यांच्या शेजारील अनिल वर्पे यांच्या देखील दोन गाई चोरीला गेल्याचे दिसून आले, याबाबत अविनाश मारुती घावटे वय ४० वर्षे रा. पाषाणमळा शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!