भांबर्डे, पवार वस्ती ता. शिरूर येथे आईनेच 11 महिने मुलाची केली हत्या... दुसरे लग्न करायचे पण मुलगा आडवा येतो म्हणून केली हत्या

9 Star News
0

भांबर्डे, पवार वस्ती ता. शिरूर येथे आईनेच 11 महिने मुलाची केली हत्या... दुसरे लग्न करायचे पण मुलगा आडवा येतो म्हणून केली हत्या 


शिरूर प्रतिनिधी 

     भांबर्डे, पवार वस्ती ता. शिरूर येथे अकरा महिन्याचा मुलगा सतत किरकिर करतो व दुसरा चांगला नवरा करावा परंतु त्यात मुलगा आडवा येत असल्याने आईने 11 महिने मुलाला घरासमोरील सिमेंटच्या ओठ्यावर डोके आपटून त्याची हत्या करून त्याचा मृत्यू देह विहिरीत फेकून दिल्याची दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यात घडली असून माता निघाली वैरीन अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे या भागात खळबळ उडाली आहे.

    यश रवींद्र पवार (वय-11 महिने) याचा खून झाला आहे.

       याबाबत रवींद्र अशोक पवार (वय 36 वर्षे रा. भांबर्डे, पवार वस्ती, ता.शिरूर)यांनी फिर्याद दिली आहे.

       याबाबत पूजा रवींद्र पवार,(रा. भांबर्डे, पवार वस्ती, ता.शिरूर जि.पुणे) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, मी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत दाखल केले आहे. त्यानंतर सदर मयताचे अनुषंगाने पोलिसांनी माझी पत्नी पूजा रवींद्र पवार यांच्याकडे सखोल तपास केला असता तसेच मी देखील पत्नी पूजा पवार यांच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की, आम्ही कोकण मुरुड येथून फिरून आल्यानंतर दिनांक ८ मार्च २६ रोजा सायंकाळी साडेपाच वाजता मुलगा यश रविंद्र पवार (वय ११ महिने) हा नेहमी प्रमाणे किरकिर करून रडतो, कोठेतरी निघून जाऊन दुसरा चांगला नवरा पाहून लग्न करावे, मुलाला सोबत घेऊन गेल्यावर कोणी लग्न करणार नाही म्हणून रागातून मुलगा यश याचे डोके घरासमोरील कपडे धुण्याचे सिमेंट ओट्यावर आपटवून त्याचा खून केला आहे. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने सिमेंट ओट्यावरील माझे मुलाचे पडलेले रक्त हे पाण्याने धुऊन, मयत मुलाला घरातील कपड्यांचे बॅगमध्ये भरून आमचे शेत जमीन गट नंबर 351 मधील विहिरीजवळ घेऊन जाऊन बॅग पाण्यात बुडून राहण्यासाठी त्या बॅगमध्ये सोबत दोन दगड भरून विहिरीतील पाण्यामध्ये टाकून दिली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, मुलाची आई पूजा पवार हिला अटक करण्यात आली असून, तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,घटनास्थळाला शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक अशोक चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ तिडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे, फॉरेन्सिक टीम पुणे यांनी भेट दिली आहे .पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, करीत आहे.





    

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!