शिरुरमध्ये महिलेवर अत्याचार व गर्भपात प्रकरणी गुन्हा

9 Star News
0

 शिरुरमध्ये महिलेवर अत्याचार व गर्भपात प्रकरणी गुन्हा 


शिरुर ( प्रतिनिधी ) 

शिरुर येथे महिलेला लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर वारंवार अत्याचार करुन महिला गर्भवती असताना महिलेचा गर्भपात केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे मयूर कमलाकर चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                        शिरुर येथे राहणाऱ्या महिलेची ओळख मयूर चौधरी याच्या सोबत झाल्यानंतर मयूर याने महिलेशी ओळख वाढवून महिलेला लग्नाचे आमिष देत महिलेवर वारंवार अत्याचार केला, दरम्यान महिला गरोदर असताना मयूर याने महिलेचा गर्भपात करत महिलेशी लग्न करण्यास टाळाटाळ केली, घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत युवतीने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी मयूर कमलाकर चौधरी वय २५ वर्षे सध्या रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. निम ता. अंमळनेर जि. जळगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे व अविनाश पठारे हे करत आहे

.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!