शिरुरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज २४ एप्रिल पासून भव्य 'व्याख्यानमाला'

9 Star News
0

 शिरुरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज २४ एप्रिल पासून भव्य 'व्याख्यानमाला'


शिरुर (प्रतिनिधी):

शिरुर शहरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे औचित्य साधून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच' वतीने सलग तिसऱ्या वर्षी भव्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील वैचारिक प्रबोधन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

     ही व्याख्यानमाला शिरुर येथील राजभोग बँकेट हॉल येथे आयोजित करण्यात आली असून, दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात नामवंत वक्ते विविध विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.

         आज शुक्रवार २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसह वाजता सामाजिक कार्यकर्ते व राजकीय विश्लेषक अजित अभ्यंकर हे 'सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती व बुद्ध विचार' या विषयावर मार्गदर्शन करणार आहे 

      तर शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर या 'भारतीय राज्यघटना व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. 

        या व्याख्यानमालेचे नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, शिरुर यांच्या वतीने करण्यात आले असून तरी शिरुर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, युवक-युवतींनी आणि विचारवंतांनी या व्याख्यानमालेस उपस्थित राहावे, असे आवाहन विचार मंचच्या अध्यक्षा सुवर्णा लोळगे व संस्थापक प्रवीण गायकवाड यांचे वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!