पिंजऱ्यातील 'ती' आणि 'तो' एका अथांग प्रेमाची साक्ष.... ना उमगली नागरिकांना... ना उमगली अधिकारी यांना.... प्रेम आणि प्रेमाचे खरे रूप याची साक्षच यात होती... परंतु ती दिसली ना कोणा....

9 Star News
0


शिरूर प्रतिनिधी ( मुकुंद ढोबळे)

       पिंजऱ्यातील 'ती' आणि 'तो' एका अथांग प्रेमाची साक्ष.... ना उमगली नागरिकांना... ना उमगली अधिकारी यांना.... प्रेम आणि प्रेमाचे खरे रूप याची साक्षच यात होती... परंतु ती दिसली ना कोणा....

      शिरूरच्या पिंपळसुटी गावातील त्या उसाच्या फडांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून एक जोडी मुक्तपणे वावरत होती. ती जोडी होती एका नर आणि मादी बिबट्याची. जगासाठी ते फक्त 'बिबट्याचीजोडी' होते, पण त्यांच्या स्वतःच्या जगात ते एकमेकांचे सोबती होते. शिकार असो वा रात्रीची शांतता, त्यांनी ही राने एकत्र तुडवली होती. अखंड प्रेमाची अनेक स्वप्न त्यांनी पाहिली होती... प्रेमाची अनेक शपथा त्यांनीही घेतल्या असतील एकत्र राहण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.

        परंतु त्यांच्याही प्रेमाला कोणाची ना कोणाची नजर लागली आणि त्या रात्री तो पिंजरा आणि नियती एका रात्री, मानवी वस्तीच्या जवळ लावलेल्या त्या लोखंडी पिंजऱ्यात नशिबाने खेळ केला. सावजाच्या आमिषाने मादी बिबट्या पिंजऱ्यात शिरली आणि तो जड दरवाजा धाडकन बंद झाला. आपली सोबती संकटात आहे हे पाहून, नराने तिथून पळ काढला नाही. उलट, तिला वाचवण्यासाठी किंवा तिच्या जवळ राहण्यासाठी त्यानेही त्या बंदिस्त जगात उडी घेतली. इतिहासात पहिल्यांदाच एका पिंजऱ्यात दोन जीव अडकले होते शौर्यासाठी नाही, तर प्रेमासाठी. हसणारी बागडणारी आणि प्रेमात अखंड बुडणारी ही जोडी फसली होती पोटासाठी पोटासाठी फसताना राणी अडकली म्हणून राजाने ही त्याच्याबरोबर पिंजऱ्यात उडी घेतलीअसेल ..कदाचित त्याला तिची साथ अखंड द्यायची होती यासाठी तर त्यांनी अठ्ठाहास केला नसेल ना !


       सकाळ झाली आणि पिंजऱ्याभोवती बघ्यांची गर्दी जमली. लोकांच्या डोळ्यांत बिबट्या पकडल्याचा आनंद आणि चेहऱ्यावर भीती होती. पण पिंजऱ्याच्या आतलं दृश्य काही वेगळंच होतं.

ती (मादी बिबट्या) कोपऱ्यात मान खाली घालून शांत बसली होती. तिच्या डोळ्यांत भविष्याची चिंता आणि स्वातंत्र्याला मुकल्याचं दुःख स्पष्ट दिसत होतं. कदाचित तिला वाटत होतं की आता आपलं काय होईल ? कदाचित सोबतीला आपला प्राण (बिबट्या) असला तरी ही लढाई जीवना मरणाची तर नाहीना अशा अखंड भितीने या मादी बिबट्याची घालमेल झाली होती आणि त्यातच ती पूर्णपणे शांत झाली होती. काय करावे हे तिला समजत नसावे कारण पुढे काय येऊन ठेवले याचे तिला भान असावे म्हणून ती नाराज आणि चिंतेत कोपऱ्यात बसलेली दिसत होती. मात्र त्याच वेळेस तो (नर बिबट्या) पिंजऱ्यात असूनही तो विचलित नव्हता. तो वारंवार तिच्या जवळ जात होता, तिला स्पर्श करत होता. जणू तो तिला सांगत होता"घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. मरण आलं तरी चालेल, पण आपण सोबत आहोत हेच तिला सांगत तर नसेल ना... तिला धीर देण्याचे काम करत असताना तो छोटी डरकाळी फोडून जमलेल्या गर्दीला याद राखा कोणी हिला हात लावला तर बघा अशी भीती दाखवत असताना तिच्या चेहऱ्यावर स्पर्श करत होता... आणि प्रेमाची अखंड साक्ष देत होता.

       माणसांची दृष्टी आणि मुक्या प्राण्यांचं पिंजऱ्यातील प्रेम आणि उभे असलेले लोक 'हिरा-रांझा' आणि 'लॅला-मजनू'च्या गोष्टी ऐकून मोठे झाले होते. पण समोर दिसत असलेल्या या जिवंत प्रेमकाव्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. माणसाला फक्त त्याच्या सुरक्षिततेचा आनंद होता, पण त्या पिंजऱ्यात एका अनाम प्रेमाची कहाणी कायमची बंदिस्त होत होती हे मात्र त्यांना दिसत नव्हते....

       शिरूर तालुक्यातील पिंपळसुटीची ही घटना आपल्याला शिकवून गेली की, प्रेम हे केवळ माणसांची मक्तेदारी नाही. त्या राकट शरीरामागेही एक हळवं मन असतं, जे आपल्या जोडीदाराला धीर देण्यासाठी स्वतःचं स्वातंत्र्यही पणाला लावू शकतं. पिंजरा उघडेल, त्यांना कदाचित वेगवेगळ्या जंगलात सोडलं जाईल, पण त्या रात्री पिंजऱ्याच्या गजांआड जे प्रेम जगाने पाहिलं, ते पिंपळसुटीच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं.

     शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथील ही घटना खरोखरच मन हेलावून टाकणारी आहे. निसर्गातील हिंस्त्र समजल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्येही इतकी हळवी संवेदना असू शकते, हे या घटनेने सिद्ध केले परंतु आम्हाला ते दिसले नाही आणि उमगले नाही..... हेच तर खरे प्रेम होते.... प्रेम होते....




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!