शिरूर शहरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक
शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथील सतरा कमानी पुलाजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणांना पुणे दहशतवादी पथकाने पकडले असून त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल किंमत पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुमित वसंत शेळके ( वय 20 वर्षे रा. पळवे, शेळकेवस्ती ता. पारनेर जि. अहिल्यानगर ) ,साजीद रफिक खान (वय 30 वर्षे रा. मंगलमूर्तीनगर, शिरुर ता. शिरुर जि.पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत ओंकार लालासाहेब शिंदे (पोलिस अंमलदार दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 08/04/2026 रोजी सकाळी 8.30 वा.चे सुमारास शिरुर जि.पुणे गावचे हद्दीत शिरुर-सतराकमान रोड, पांजरपोळ जवळ येथे सुमित वसंत शेळके (वय 20 वर्षे रा. पळवे, शेळकेवस्ती ता. पारनेर जि.अहिल्यानगर )हा त्याचे कब्जात एक गावठी बनावटीचे पिस्तुलबेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव बाळगले असताना मिळून आला असुन सदरचा पिस्तुल त्याला साजीद रफिक खान( वय 30 वर्षे रा. मंगलमूर्तीनगर, शिरूर ता. शिरुर जि.पुणे) याने दिलेला आहे म्हणुन माझी दोघांचे विरुद्ध सरकार तर्फे शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3. 25 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे
.

