शिरूर आणि वेल्हे येथील जबरी चोरीचे गुन्हे उघड; ७० सीसीटीव्ही आणि १४५ किमीचा थरार, ४ सराईत गुन्हेगार गजाआड

9 Star News
0

 

शिरूर आणि वेल्हे येथील जबरी चोरीचे गुन्हे उघड; ७० सीसीटीव्ही आणि १४५ किमीचा थरार, ४ सराईत गुन्हेगार गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ३ लाख ५० हजारांचे दागिने हस्तगत


शिरूर,(प्रतिनिधी)

     शिरूर शहरात भरदिवसा महिलेचे दागिने चोरणारी व वेल्हे परिसरातमिरची पूड टाकून जबरी चोरी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या कारवाईत एकूण ४ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून,त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    शिरूर येथील महिलेच्या गळ्यातील गंठण पळवणारे अनिल गोरखनाथ मस्के ( वय ३३ वर्षे, रा. बाळूमामा गल्ली विठाई बिल्डींग, साने चौक चिखली, पिंपरी चिंचवड),अभिजीत सुभाष रॉय (वय २६ वर्षे, रा. श्रीराम कॉलनी, म्हेत्रेवाडी, चिखली पुणे) यांना अटक केली आहे.

       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २९ मार्च रोजी शिरूरमधील बागवाननगर येथे प्रमिला पडवळ या महिलेच्या गळ्यातील ६ तोळ्यांचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले होते. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर ते अहिल्यानगर आणि पुन्हा अहिल्यानगर ते चाकण अशा १४५ किलोमीटर अंतरावरील ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी हे चिखली (पिंपरी-चिंचवड) परिसरातील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सापळा रचून अनिल गोरखनाथ मस्के (वय ३३) आणि अभिजीत सुभाष रॉय (वय २६) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेतीन तोळे सोने आणि गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपी अभिजीत रॉय याच्यावर १८, तर अनिल मस्के याच्यावर १० गुन्हे आधीच दाखल आहेत.

       तसेच वेल्हे तालुक्यातील निगडे येथे ५ एप्रिल रोजी राहुल कोंढरे या ठेकेदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून आणि कोयत्याने मारहाण करून १८ तोळे सोने व रोख रक्कम लुटली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या. गुन्हेगारी रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढली असता अभिषेक सचिन खुटवड (वय २३, रा. कात्रज) आणि प्रसाद सतीश शिंदे (वय २१, रा. शनीनगर, कात्रज) यांची नावे समोर आली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून १ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

     ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले व हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत ,वेल्हे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते, पोसई हनुमंत पासलकर, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमोण, सागर धुमाळ, सागर नामदास, अमोल शेडगे, मंगेश भगत तुषार भोईटे, संतोष भापकर, गणेश धनवे, अतुल डेरे, महेश बनकर, अतुल फरांदे, शिरूर पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, वेल्हे चे पोलीस अंमलदार ज्ञानदीप धिवार, सोमेश राउत, रोहीत मरभळ यांनी केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!