शिरूरला पोलिस स्टेशनमध्ये धुमश्चक्री दोन गट एकमेकांना भिडले; अखेर पोलिसांच्या लाठीमारानंतर जमाव पांगला
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर पोलिस स्टेशनचे आवारात मध्यरात्री दोन गटात धूम चक्री झाली दगडफेक शिवीगाळ, धमक्यांसह तुफान राडा झाला जमाव काबूत येत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात येतात पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. याराड्यात दोनजण जखमी झाले असून, याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जमाव जमवून सामाजिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील ५० जणांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालाअसून यात यात सराईत गुन्हेगारांचा समावेश .
याबाबत पोलिस हवालदार सतीश नाथराव मुंडे यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी हरीश रवींद्र राजपूत, राजू शेवाळे, गणेश भोसले, विनोद जाधव, सलमान शेख, हाफीज शेख, कलिम सय्यद, कय्यूम सय्यद, तेजस जाधव, हबीब सय्यद, तरबेज, काळू बोरगे (सर्व रा. शिरूर) यांच्यासह ५० जणांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार मध्यरात्री बाराच्या सुमारास हरीश राजपूत हा आर्थिक वादातून राजू शेवाळे व इतरांविरुद्ध तक्रार देण्यासाठी शिरूर पोलिस स्टेशन येथे आला असता त्यानंतर थोड्याच वेळात त्याच्या बाजूच्या व विरोधी गटातील तरुणांचा जमाव पोलिस ठाण्याच्या आवारात जमा झाला. पोलिस हवालदार उमेश भगत हे तक्रार घेत असतानाच जमलेल्या तरुणांमध्ये आरडा ओरडा, आरोप प्रत्यारोप व शिवीगाळ सुरू झाली.पोलीस हवलदार उमेश भगत, सतीश मुंडे, बंडू कोठे, शंकर चव्हाण, महिला पोलीस अंमलदार परवीन पप्पूवाले, भाग्यश्री सुपेकर, चैताली सपकाळ हे सदर जमावाला समजावून सांगत असताना जमाव पोलिसांचे काहीही ऐकून न घेता पोलिसांसमोर एकमेकांना मारहाण करत सदर जमाव पोलीस स्टेशन समोरच एकमेकांवर दगडफेक करु लागला, त्यांनतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी अतिरिक्त पोलीस बळाचा वापर करत गर्दी नियंत्रणात आणली मात्र यावेळी झालेल्या दगडफेक मध्ये काही इसम जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, याबाबत पोलीस हवालदार सतीश नाथराव मुंडे वय ३८ वर्षे रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी हरिष राजपूत, राजू शेवाळे, गणेश भोसले, विनोद जाधव, तरबेज बोरगे, हबीब सय्यद, सलमान शेख, हफिज शेख, कलीम सय्यद, कायम सय्यद, तेजस जाधव यांसह चाळीस अनोळखी इसम (सर्व रा. शिरूर ता. शिरुर जि पुणे )यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.

