शिक्रापुरात भटक्या कुत्र्यांनी तोडले बालिकेचे लचके
गंभीर जखमी झालेल्या बालिकेवर ससूनमध्ये उपचार सुरु
शिरूर
( प्रतिनिधी ) काल शिरूर शहरात तर आज शिक्रापूर येथे एका शाळकरी बालिकेवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी हल्याची घटना घडली असून अंजली गोपाल राठोड असे जखमी बालिकेचे नाव आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक परिसरात राहणारी अंजली राठोड हि तिचा लहान भाऊ चेतन राठोड याला पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सोडून घरी येत असताना साई पर्ल सोसायटीच्या समोर सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी तिच्यावत हल्ला चढवला यावेळी अंजली सह आजूबाजूच्या महिलांनी मोठा आरडाओरडा केला असता साईपर्ल सोसायटी मध्ये राहणारे सुभाष आदक यांनी भिंतीवरुन उडी घेत कुत्र्यांच्या घोळक्याकडे जाऊन अंजलीला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले मात्र यावेळी कुत्र्यांच्या हल्ल्यात अंजली गोपाल राठोड वय ११ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे हि बालिका गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र घडलेल्या घटनेने परिसरातील महिला व शाळकरी मुळे भयभीत झाले असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. तर कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बालिकेला सुभाष आदक यांनी वेळीच कुत्र्यांच्या तावडीतून सोडवल्याने अनर्थ टळला आहे.
स्वतंत्र चौकट १ –
शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात श्वानदंश झालेली रुग्ण बालिका सकाळी दाखल झालेली होती मात्र तिच्यावर दहा बारा ठिकाणी झालेला दंश गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यावरील लसीकरण साठी तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास नरवडे यांनी सांगितले.
स्वतंत्र चौकट २ –
शिक्रापूर गावात शेकडो कुत्र्यांचे आपण लसीकरण केलेले असून पाबळ चौक परिसरात साई पर्ल सोसायटी लगत बालिकेवर झालेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाहणी करुन योग्य उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.
शिक्रापूर ता. शिरुर येथे कुत्र्यांचा हल्ला झालेल्या ठिकाणी भेट देताना सरपंच रमेश गडदे.

