शिरुर मध्ये घरात शिरून महिलेचा विनयभंग
शिरूर
( प्रतिनिधी ) शिरुर शहरातील महादेव नगर मध्ये राहणारी महिला घरात एकटी असताना अचानक संपत उबाळे हा इसम महिलेच्या घरात आला, त्याने घरात महिला एकटी असल्याचे पाहून महिलेचा हात पकडून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत महिलेने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी संपत ज्ञानदेव उबाळे रा. हिंगणी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव या करत आहे
.

