शिरूर येथील श्री शिवसेवा मंडळ ट्रस्टच्या विश्वस्तपदी युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांची नियुक्ती
शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथील श्री शिवसेवा मंडळ ट्रस्टच्या विश्वस्तपदी युवा उद्योजक आदित्य प्रकाशभाऊ धारिवाल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती श्री शिवसेवा मंडळ ट्रस्टचे सचिव मनसुख गुगळे यांनी दिली आहे.
या निवडीबद्दल श्री शिवसेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांची विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, ट्रस्टचे सचिव मनसुख गुगळे, विश्वस्त अँड. सुभाष पवार, डॉ. योगेश उपलेंचवार, सुरेश खांडरे, श्रीनिवास परदेशी, ज्ञानेश्वर घावटे उपस्थित होते.
शिरूर येथील श्री शिवसेवा मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने सुरू असलेले सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्य यापुढे वाढवणार असल्याचे सांगून, गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विश्वस्त आदित्य धारीवाल यांनी सांगितले.

