शिरुरमधून महिलेचे सहा तोळ्यांचे दागिने हिसकावले... शिरूर पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांचा धुमाकुळ

9 Star News
0

 शिरुरमधून महिलेचे सहा तोळ्यांचे दागिने हिसकावले... शिरूर पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांचा धुमाकुळ 


शिरूर 
( प्रतिनिधी )

 शिरुर शहरात बागवान नगर येथे वाहनाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेचे दुचाकीहून आलेल्या दोघांनी साडे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरूर पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांचा धुमाकुळ महिला मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

                  गोलेगाव ता. शिरुर येथील प्रमिला पडवळ व निर्मला पडवळ या दोघी शिरुर मध्ये आलेल्या असताना बागवान नगर येथे घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या, दरम्यान दुचाकीहून दोन युवक सदर ठिकाणी आले त्यातील एक युवक दुचाकीहून उतरुन प्रमिला यांच्या जवळ आला, त्याने प्रणीला यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले दरम्यान प्रणीला व निर्मला यांनी आरडाओरडा केला असता सदर युवकाने हिसका मारुन प्रणीला यांच्या गळ्यातील साडेसहा तोळे वजनाचे दागिने हिसकावून घेऊन पळत जाऊन दुचाकीवर बसला दरम्यान दोघे दुचाकीहून जोशी वाडीच्या दिशेने पळून गेले, याबाबत प्रमिला शिवाजी पडवळ वय ५० वर्षे रा. पडवळवस्ती गोलेगाव ता. शिरुर शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात दोन युवकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे

.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!