धारिवाल यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात १७१९ रक्तदात्यांनी रक्तदान करून उच्चांक
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर चे उद्योगपती दानशूर स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात १७१९ रक्तदात्यांनी रक्तदान करून उच्चांक गाठला आहे.
यंदा रक्तदान शिबिराचे हे नववी वर्ष आहे तर पी आर धारिवाल फाउंडेशन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ व पुणे येथील केइम ब्लड बँक पुणे, शिरूर येथील ओम ब्लड बँक, अहिल्यानगर आनंद ऋषी ब्लड बँक , रुबी हॉल ब्लड बँक, अक्षय ब्लड बँक, विद्यमाने हे महारक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरा महाराष्ट्राचे डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी भेट दिली.
दानशूर उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या ८७ व्या जयंती निमीत्त आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, त्यांच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल, युवा उद्योजक आदित्य धारिवाल, नाते रक्ताचे राम बांगर,यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन व स्वर्गीय रसिकलाल धारीवाल यांच्या प्रतिमेत पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे,उपनगराध्यक्ष मितेश गादिया, जिल्हापरिषद सदस्या सुजाता पवार,
माजी नगरसेवक विजय दुगड, माजी नगराध्यक्ष जाकिरखान पठाण, पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता अशोक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी नगरसेवक विजय दुगड, प्रकाश धाडीवाल, रक्ताचे नाते संस्थेचे प्रमुख रामभाऊ भांगड,गोडाजी पार्श्वनाथ ट्रस्ट विश्वस्त रमेश कर्नावट, बाजार समितीचे माजी संचालक आबाराजे मांढरे प्रशांत शिंदे,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, मनीषा कटके, महेबुब सय्यद, अनिल बांडे नगरसेवक ,नगरसेविका, प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आज सकाळपासून सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात मोठा प्रतिसाद मिळाला असून प्रत्येक रक्तदात्यास एक ट्रॅव्हलिंग बॅग देण्यात आली तर उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त एकूण रक्तदात्यातून लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी काढून ८७ जणांना सायकली रक्तदात्यांना भेट देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक विजय दुगड, सूत्रसंचालन सुशांत कुटे आभार प्रशांत शिंदे यांनी मानले .

