शिरूर येथे २९ मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिर

9 Star News
0

 


शिरुर, प्रतिनिधी 

           शिरूर येथे २९ मार्च रोजी उद्योजक तथा शिरुरचे मा. नगराध्यक्ष स्व रसिकलाल धारिवाल यांच्या ८७ व्या जयंती निमित्त पी. आर फाऊंडेशन व प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

   उद्योगपती  स्व रसिकलाल धारिवाल यांचा शिरुर शहराच्या योगदानात मोलाचा वाटा आहे. अनेक धार्मिक, वैद्यकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. 

      या अगोदर झालेल्या रक्तदान शिबिरात १५०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी आपला सहयोग नोंदवून विक्रमी टप्पा पार केला आहे. 

      शिरुर मंगल कार्यालय येथे रविवार दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.

      तसेच सामाजिक भावनेतून सर्व रक्तदात्या मधून लकीड्रॉ पद्धतीने ८७ रक्त दात्यांना सायकल वाटप करण्यात येणार असून प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे  आयोजकांनी सांगितले आहे. 

     या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी  सहभागी ह्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

     याबाबत अधिक माहिती साठी व नाव नोंदणी साठी ९८८१२१४४९१,९८८११७८७६ ०,९८२२२८१४११,९८२२५३१५१५,९०९४२०२१२१ या नंबरवर संपर्क करावा असे आयोजकांनी सांगितले आहे

.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!