शिरूर–हवेली मतदारसंघासाठी रस्त्यांच्या कामासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर आमदार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रयत्नांना यश

9 Star News
0

 

शिरूर–हवेली मतदारसंघासाठी रस्त्यांच्या कामासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर आमदार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रयत्नांना यश


शिरूर प्रतिनिधी 

        शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिरूरचे आमदार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांनी दिली असून हा निधी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाला असून यासाठी कटके यांनी विशेष प्रयत्न केले आहे. 

        या निधीतून शिरूर व हवेली तालुक्यातील अनेक प्रमुख मार्गांचे मजबुतीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण तसेच काँक्रीटीकरण करण्यात येणार असून ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

       शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. शिरूर–निमोणे–गुणाट–कुरुळी–वडगाव रासाई–मांडवगण फराटा (रा.म. ९) या प्रजिमा ५३ मार्गाच्या सुधारणा कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मलठण–ढोकसांगवी–कोरेगावकडे जाणाऱ्या निमोणे मार्गाच्या (प्रजिमा ११४) किमी दरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत.

        याशिवाय मिरवडी–दहिटणे–राहू–वाळकी संगम ते रांजणगाव सांडस–नागरगाव–कुरळी (प्रजिमा ११३) या मार्गावरील रस्त्याचे किमी दरम्यान रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच आरणगाव–आलेगाव मार्गावरील वडगाव रासाई–सादलगाव–मांडवगण फराटा–गणेगाव तांदळी (प्रजिमा ४०) या रस्त्याच्या कामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.


  वीवीवीत्याचबरोबर न्हावरे–चिंचणी (प्रजिमा ५९) या मार्गावरील रस्त्याच्या किमी दरम्यान मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. तसेच शिरूर–निमोणे–निर्वी–कुरुळी–वडगाव रासाई–मांडवगण फराटा (प्रजिमा ५३) या परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत.


दरम्यान, हवेली तालुक्यातीलही काही महत्त्वाच्या रस्त्यांना या निधीतून चालना मिळणार आहे. वाघोली–भावडी–तुळापूर (प्रजिमा १६६) या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोरेगाव–भिवरी–वाडेबोल्हाई–डोंगरगाव–पेरणे फाटा–वढू बुद्रुक ते वढू खुर्द (प्रजिमा १९ / प्रजिमा २२६) या मार्गावरील रस्त्याचे मजबुतीकरण, सुधारणा व रुंदीकरण करण्यासाठीही शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.

      या विविध रस्त्यांच्या कामांमुळे शिरूर व हवेली तालुक्यातील गावांमधील दळणवळण अधिक सुकर होणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्राशी जोडणी अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

        स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार माऊली आबा कटके यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

 आगामी काळात या कामांना गती मिळाल्यास ग्रामीण विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वासही आमदार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!