शिरूर मधून दहा लाखांचे प्लंबिंग मटेरियल चोरी
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील पाषाण मळा येथे रयत रेसिडेन्सी च्या सुरू असलेल्या बिल्डिंग जवळून तब्बल दहा लाखांचे प्लंबिंग मटेरियल व आधी साहित्य चोरी गेल्याची घटना घडली असल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे आज्ञा चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर शहरातील पाषाण मळा येथे रयत रेसिडेन्सी बिल्डिंगचे बांधकाम सुरू असून सदर ठिकाणी एका खोलीमध्ये बिल्डिंग साठी लागणारे पाईप दरवाजाचे लोक यांचे आधी साहित्य आणून ठेवलेले आहे, दिवसभर काम केल्यानंतर सदर पिकांचे कामगार घरी गेलेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कामगार त्या ठिकाणी आले असता त्यांना साइटवरील खोलीच्या पाठीमागील पत्र्याचे स्क्रू उचकटलेले दिसून आले त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती संबंधितांना देत खोलीमध्ये पाहणी केली असता खोलीमधील तब्बल दहा लाख रुपये किमतीचे प्लंबिंग मटेरियल दरवाजाचे लॉक फिटिंगचे मटेरियल असे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले याबाबत उल्हास शंकरराव वाळसे वय 50 वर्षे रा प्रीतम नगर शिरूर ता शिरूर जी पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी त्यांनी पोलिसांनी आत्मचोर त्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नखाते हे करत आ
हे.

