शिरूर येथे २४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन

9 Star News
0


 शिरूर–घोडनदी उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व .कुटुंबियांचा वतीने २४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून भव्य श्री शिव महापुराण कथा


शिरूर प्रतिनिधी 

शिरूर–घोडनदी येथे उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व .कुटुंबियांचा वतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून भव्य श्री शिव महापुराण कथा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाच्या मांडवाच्या वासाचे विधीवत पूजन करण्यात आले.

      या भव्य मांडवाचे वासापूजन व्यावसायिक अमित गादिया, हेमंत गादिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या धार्मिक सोहळ्याचे आयोजन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धरिवाल व आदित्य धारिवाल आणि पी. आर. धारीवाल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.


      यावेळी भगवा ध्वज फडकवण्यात आला हा ध्वजवंदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व रामलिंगच्या सरपंच शिल्पा गायकवाड यांच्या हस्ते झाले.

      वासा पूजनावेळी मंत्रोच्चार, शिव नामस्मरण आणि ‘हर हर महादेव’ रामलिंग महाराज की जय च्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

       आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून ही श्री शिव महापुराण कथा दि. २४ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत रामलिंग रोड शिरूर (घोडनदी) येथे होणार आहे. 

      यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नसीम खान,घोडगंगाचे माजी संचालक पाडुरंग थोरात, व्यावसायिक रमेश कर्नावट,वैजापूरचे विशाल संचेती, व्यवसायिक सुनील धाडीवाल, मनसुखलाल गुगळे, माजी नगरसेवक विजय दुगड, विनोद धाडीवाल, बाजार समितीचे माजी संचालक आबाराजे मांढरे विश्वस्त, ग्रामस्थ तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मनोभावे पूजा करून भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होत शिवकथेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रार्थना केली.


, “श्री शिव महापुराण कथा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला सदाचार, संयम आणि भक्तीचा मार्ग दाखवणारा उपक्रम आहे. या पवित्र शिवकथेत सहभागी होऊन शिवकृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

     यावेळी शिवसेवा मंदिर विश्वस्त, रामलिंग मंदिर विश्वस्त, नगरसेवक, नगरसेविका, विविध गणेश मंडळाचे कार्यकर्त उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!