शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे दोघांनी २४ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून केला खून

9 Star News
0

 शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे दोघांनी २४ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून केला खून


शिरूर प्रतिनिधी

        सरदवाडी ता. शिरूर करडे घाटाजवळील आयएफबी कंपनी जवळ अज्ञात कारणावरून दोघाजणांनी २४ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्घुण खून केला असल्याची घटना घडली असून याबाबत दोनही आरोपींना अटक करण्यात शिरूर पोलिसांना यश आले असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.

          संतोष बाळासो पवार (वय 24 वर्ष, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. अळकुटी) याचा या मारहाणीत खून झाला आहे.

   याबाबत मयताची पत्नी साधना संतोष पवार (वय 21 वर्ष, रा. करडे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

           याप्रकरणी नितीन उर्फ देवा सुरज चव्हाण (रा. पिंपळगाव ता. आंबेगाव जि. पुणे) ,गणेश तानाजी सांळुखे (रा. निरगुडसर ता. आंबेगाव जि. पुणे ) या दोघांना ताब्यात घेण्यात आहे.

    याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सरदवाडी ता. शिरूर हद्दीत करडे घराजवळ आयएफबी कंपनी येथे आरोपी नितीन उर्फ देवा सुरज चव्हाण (रा. पिंपळगाव ता. आंबेगाव जि. पुणे )व गणेश तानाजी सांळुखे (रा. निरगुडसर ता. आंबेगाव जि. पुणे )यांनी कोणत्यातरी कारणावरून धारदार शस्त्राने संतोष बाळासो पवार, याचे छातीवर, हातावर व पाठीवर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे. याबाबत मयताची पत्नी साधना संतोष पवार यांनी फिर्याद दिल्याने दोघा जणांना ताब्यात घेतले असून, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम यांनी पाणी करून तपासणी केली आहे.

फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद खटटींग करीत आहे.


    

   

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!