शिरूर तालुक्यातील जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत ७५.५९ टक्के मतदान

9 Star News
0



शिरूर प्रतिनिधी 

         शिरूर तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणासाठी आज मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली असून यासाठी आज अंदाजे ७५.५९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे. किरकोळ प्रकार वगळता निवडणूक मतदान शांततेत पार पडले.

आजच्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यासाठी ७५.५९ टक्के मतदान तर निवडणुकीत २ लाख २८ हजार ११३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यात अंदाजे १ लाख १८ हजार ६८५ पुरुष मतदारांनी तर १ लाख ९ हजार ४२२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

      शिरूर तालुक्यातील जिल्हापरिषदेचे ७ गटातून २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ गणातून ४६ उमेदवार यांचे भवितव्य आज पेटी बंद झाले आहे.

या निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार असून ही मतमोजणी शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडाऊन येथे होणार आहे

       शिरूर तालुक्यातील ३७१ मतदार केंद्रावर आज सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांचा उत्साह दिसून येत होता. 

आज सकाळी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी त्यांच्या टाकळी हाजी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तर माजी आमदार अशोक पवार यांनी वडगाव रासाई येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

गुणाट गावातील तनुजा बाळासाहेब करपे या नववधूने लग्नाचे अगोदर मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.

 सकाळी पहिल्या दोन तासांमध्ये ७.२१टक्के , सकाळी साडेअकरा वाजता २१.३७ टक्के, दुपारी दीड वाजता ३८.४८ टक्के, दुपारी साडेतीन वाजता ५५.१९ टक्के असे मतदान झाले त्यानंतर शेवटच्या काही तासात मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडले त्यामुळे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रात मतदारांनी रांगा लावल्या असल्याचे दिसून आले.रामलिंग येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी रांग लावली होती.शिरूर येथील तरडोबावाडी येथे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.

शिरूर तालुक्यातील तरडोबावाडी, रामलिंग, निमोणे, इनामगाव, तांदळी, वडगाव रासाई, न्हावरा, रांजणगाव गणपती, करडे, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर सणसवाडी, पाबळ, कारेगाव, कवठे यमाई टाकळीहाजी, मलठण या गावांमध्येही मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याच्या दिसून आल्या.

२७)टाकळी हाजी १६७३५ /८०.७४ टक्के 


२८)कवठे यमाई १६६८८ /७५.९९ टक्के 


२९) शिरूर ग्रामीण.१७१०७ /७२.६९ टक्के 


३०) न्हावरा २१४७८१ /७५.०१ टक्के 


३१) रांजणगाव गणपती१६८७० /८१.३७ टक्के 


३२)कारेगाव १६३६३ /८०.२५ टक्के 


३३) पाबळ १६९६२ /७२.८३ टक्के 


३४) केंदुर १७९५१ /७६.९४ टक्के 


३५) शिक्रापूर १४९५० /७०.६६ टक्के 


३६) सणसवाडी १४०४५ /७१.७० टक्के 


३७) तळेगाव ढमढेरे १७४७५ /७५.७१ टक्के 


३८) रांजणगाव सांडस १६७०८/ ८१.१२ टक्के 


३९) वडगाव रासाई १६०५१ /७२.१३ टक्के 


४०) मांडवगण फराटा १५४२७ /७१.९७ टक्के 

रामलिंग येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी रांग लावली होती.




शिरूर येथील तरडोबावाडी येथे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.




कारेगाव येथील तळेकर कुटुंबांनी एकाच वेळी सर्वांनी मतदान केले



गुणाट गावातील तनुजा बाळासाहेब करपे या नववधूने लग्नाचे अगोदर मतदान 


करून मतदानाचा हक्क बजावला.



शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे आज निकीता मनीष गडिया (वय २१ वर्षे) हिने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. केवळ दोन फूट उंची असलेल्या निकीता गडिया या मतदान करणाऱ्या सर्वात कमी उंचीच्या तरुण मतदार ठरल्या आहेत.

शारीरिक मर्यादा असूनही लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची त्यांची जिद्द आणि उत्साह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. मतदान केंद्रावर उपस्थित नागरिकांसह निवडणूक कर्मचाऱ्यांनीही निकीता हिच्या या धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले.

लोकशाहीत प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करणारे हे प्रेरणादायी दृश्य आज कोरेगाव भीमा येथे पाहायला मिळाले.

महत्वाचे 

गण निहाय झालेले मतदान आकडेवारी यावर खाली पाहू शकता.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!