शिरूर तालुक्यातील पाबळ येथे विहिरीत आढळले महिला व तिच्या दोन मुलांचे मृतदेह

9 Star News
0

 शिरूर तालुक्यातील पाबळ येथे आढळले महिला व तिच्या दोन मुलांसह

 


शिरूर प्रतिनिधी 

पाबळ तालुका शिरूर येथील थोर स्थळ वस्ती येथील एका विहिरीमध्ये विवाहित महिलेचा व तिच्या दोन मुलांचे मृतदेह रविवारी दि. 1 रोजी आढळून आले. 

अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव.(वय 30वर्ष)  

 सार्थक राजू जाधव (वय.5 वर्ष) गौरी राजू जाधव वय चार महिने पाबळ ता. शिरूर (मूळ राहणार बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ) अशी या मयत आई व मुलांची नावे आहेत.या बाबत त्यांच्या बहीण जयश्री सुनील जाधव यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी या विवाहितेचा पती राजू पांडुरंग जाधव याच्याशी रविवारी सकाळी भांडण झाले होते. यानंतर आपल्या दोन मुलांसह घरच्या बाहेर पडली होती. दुपारी दोनच्या सुमारास राजु जाधव यांनी त्यांची शोधाशोध सुरुवात केली. यावेळी गौरी जाधव या चिमुरडीचा मृतदेह थोर स्थळ येथील परमेश्वर पिंगळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये तरंगताना आढळून आला.या वेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या विहिरीमध्ये शोधाशोध केल्यानंतर अहिला जाधव व मुलगा सार्थक जाधव यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पती वारंवार चारित्र्यावर संशय घेऊन भांडणे करत असल्याने या महिलेने आपल्या दोन मुलांचे जीवन संपविल्याच्या अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

 (फोटो... अहिला जाधव सार्थक जाधव गौरी जाधव

घटनास्थळ विहीर)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!