शिरूर पंचायत समिती सभापती निवडणूक ९ मार्चला....

9 Star News
0

 

शिरूर पंचायत समिती सभापती निवडणूक ९ मार्चला....


शिरूर प्रतिनिधी 

       तालुका पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक दिनांक ९ मार्च २६ रोजी पंचायत समितीच्या विशेष सभेमध्ये होणार आहे.ही निवडणूक छत्रपती संभाजी सभागृह हॉल पंचायत समिती या ठिकाणी होणार असल्याची माहिती शिरूर गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दिली या निवडणुकी करिता उपविभागीय अधिकारी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून असणार आहे.

      तर शिरूर पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण ओबीसी महिला आहे. तर उपसभापती या दोघा पदांसाठी आता कोणाच्या नावाची वर्णी लागते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

       नुकत्याच शिरूर तालुक्यातील पंचायत समिती निवडणूक या ७ सात फेब्रुवारी रोजी झाल्या तर त्यांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला आहे.

        त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार, जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक दिनांक २० मार्च २०२६ पूर्वी आयोजित करावी असे निर्देश देणेत आलेले आहेत त्यानुसारच पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक ९ मार्च रोजी होणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम ५९ (३), ६७ (३), ६८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे जिल्हयातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूकीकामी पहिली विशेष सभा घेणेकरिता जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी पुणे, खालील पंचायत समित्यांसाठी त्यांचेसमोर दर्शविलेल्या अधिकाऱ्यांना पिठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले . असून शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिव असणार आहे

 ६८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे जिल्हयातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूकीकामी पहिली विशेष सभा घेणेकरिता पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी खालील पंचायत समित्यांसाठी त्यांचेसमोर दर्शविलेल्या अधिकाऱ्यांना पिठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करीत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!