शिरूर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील प्रभू श्रीराम यांनी स्थापित केलेल्या शिवलिंगाला दररोज एक तांब्याभर पाणी आणि त्याचे दर्शन घेतले तर जीवनातील सगळ्या कठीणातील कठीण समस्यातून मुक्त होऊ असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री शिव महापुराण कथावाचक पंडित आचार्य प्रदीपजी मिश्रा सीहोरवाले यांनी करून एक लोटा जल सारी समस्या का हल हा मंत्र आलेल्या भाविकांना दिला तर भगवान शिवशंकराला तुमची संपत्ती सत्ता धन काहीच नको फक्त भगवान शिवशंकराला तुमचा विश्वास हवाय त्यामुळे अवघा शिरूर नाहून निघाला श्री शिव महापुराणकथेत...
शिरूर घोडनदी येथे आज २४ फेब्रुवारी २६ पासून श्री शिवमहापुराण कथेची सुरूवात झाली त्यावेळी देशातील महाराष्ट्रातील अनेक भागातून शेकडो भाविकांनी श्री शिव महापुराण कथेचा लाभ घेतला. ही कथा २ मार्च पर्यंत शिरूर येथे असणार आहे.
याकथेची सुरवात उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल त्याच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल, चिरंजीव युवा उद्योजक आदित्य धारिवाल, कन्या साक्षी रोहित मेहता, भगिनी उज्वला,सुरेखाजी चोपडा, कल्पना लुणावत, यांचे हस्ते पूजन करून करण्यात आली. यावेळी हर हर महादेव यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
शिरूर घोडनदी परिसराला श्री शिव महापुराण ही कथा ऐकण्याचे भाग्य मिळाले असून येथील लोक मोठे भाग्यशाली असल्याचे सांगून ही सर्व महादेवाची कृपा असल्याचे पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितले.
शिरूर घोडनदी परिसर हा धार्मिक क्षेत्रामध्ये गौरवण्याचा परिसर असून भगवान श्रीराम वनवासात असताना ते शिरूर या पुण्यभूमीतून भगवान महादेवाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी शिवलिंग स्थापन करून आशीर्वाद घेतले आहे भूमीला एक उच्च असे महत्त्व आहे. ज्या भागात शिवकृपा होती त्या भागातील परिसरातील गावातील खेड्यातील लोकांच्या जीवनात एक नवीन सौभाग्य निर्माण होत असते असे सांगून श्री शिवमहापुराण कथा शिवभक्तांच्या मुळेच होत असे म्हणून या कथेचे आयोजन करण्याचे भाग्य रामलिंग भक्त रसिकलालजी धारिवाल यांच्या कुटुंबाला मिळाले असून अशा दानशूर कुटुंबांनी संपूर्ण देशामध्ये अनेक तीर्थक्षेत्रामध्ये धर्मशाळा निर्माण केले आहे अन्नछत्र निर्माण केले आहे आणि मोठ्या प्रमाणात दानही केले आहे हे शिरूरकारांसाठी धार्मिक कुटुंब असल्याचे सागितले.
यावेळी श्री महापुराण कथावाचक पंडित आचार्य प्रदीपजी मिश्रा सीहोरवाले यांनी आलेल्या भाविकांना महादेवाची भक्ती करण्याचा सल्ला दिला.
यावेळी 60 हजाराहून जास्त शिवभक्त ही श्री शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी तर अनेकजण मुक्कामासाठी या ठिकाणी आले होते यावेळी प्रत्येकाने हर हर महादेव जयघोष केला आणि श्री शिव महापुराण कथेच्या भक्त सागरात डुंबून गेले .

