शिरूर पंचायत समिती सभापती निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार विद्यमान आमदार माऊली कटके यांना धोबीपछाड देणार का?

9 Star News
0

 शिरूर पंचायत समिती सभापती निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार विद्यमान आमदार माऊली कटके यांना धोबीपछाड देणार का?


शिरूर दिनांक प्रतिनिधी 
          शिरूर पंचायत समिती सभापती सभापती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे का ?आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांना देणार का ?
आमदार दिलीपराव वळसे पाटील गटाचा ? माजी आमदार अशोक पवार  सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत धोबीपछाड देणार का ? शिरूर तालुका पंचायत समितीमध्ये सभापती निवडणुकीत गद्दारीला शह देण्यासाठी भाजपचा सभापती उपसभापती  झाला तर नवल वाटायला नको...
           नुकतेच शिरूर तालुका पंचायत समिती सदस्यांची निवडणूक झाली यामध्ये एकूण १४ पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत त्यामध्ये आठ पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून यामध्ये दोन सदस्य माजी आमदार अशोक पवार यांना मानणारे आहेत. या दोन सदस्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माऊली कटके यांनी प्रचार करून या उमेदवारांना पाडण्यासाठी आव्हान नागरिकांना करून अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदेचे दादा पाटील फराटे पंचायत समितीचे उमेदवार विजेंद्र गद्रे व यांचा प्रचार खुलेआम करून राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असणारे माजी आमदार यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाताई पवार यांना पराभूत करावा प्रचार विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांनी केले होते. 
        परंतु या मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती वडगाव रासाई व मांडवगण फराटा गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले यात शिरूर चे आमदार माऊली कटके यांनी प्रचार केलेले तीनही उमेदवार पराभूत झाले. हा गद्दारीचा इतिहास शिरूर तालुक्याला लागला आहे.
शिरूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये माजी आमदार अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याबरोबर गटबंधन केले होते  कटकेना सहकार्य केले. तरीही त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार माऊली कटके यांनी खुनशी राजकारण करून माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी यांना पराभूत करण्यासाठी मोठे योगदान देण्याचा प्रयत्न केला परंतु ते निष्फळ ठरले.
      आता पंचायत समितीमध्ये संख्या बळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ८ त्यात अशोक पवार गटाचे २, अपक्ष १, भारतीय जनता पार्टीचे ५ असे एकूण १४ सदस्य निवडून आले आहेत. त्यात यामध्ये आंबेगावचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांना मानणारे ही काही पंचायत समिती सदस्य आहेत. 
         तर या पंचायत समिती निवडणुकीमध्ये सात पेक्षा जास्त म्हणजे आठ पंचायत समिती सदस्य ज्या गटाकडे असेल किंवा पक्षाकडे असे त्याचा पंचायत समिती सभापती होऊ शकतो .
परंतु शिरूर पंचायत समिती सभापतीपद नक्की कोणाकडे जाते माजी आमदार अशोक पवार की विद्यमान आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके का आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या गटाकडे जाते हे पाहणे महत्त्वाचे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गद्दारीचा राजकारणाला शह देण्यासाठी भाजपचा सभापती झाला तर नवल वाटायला नको हे मात्र खरे!

       शिरूर पंचायत समिती गण व विजयी उमेदवार पुढील प्रमाणे 
भाजप पंचायत समिती सदस्य 
टाकळीहाजी गण
सुनीता बाळकृष्ण कड  (भाजप) विजयी , 
कवठेयमाई गण
कांचन राजेंद्र सांडभोर (भाजप) ,
रांजणगाव गणपती गण 
सागर शिवाजी देवकर (भाजपा) 
कारेगाव गण 
मनीषा सतीश पाचंगे (भाजपा)  
तळेगाव ढमढेरे गण 
विद्या राजेंद्र भुजबळ (भाजपा),

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य 
शिरूर ग्रामीण गण 
स्वाती विठ्ठल घावटे  (राष्ट्रवादी)
न्हावरा
दीपक सिताराम पवार  ( राष्ट्रवादी) 
पाबळ गण 
वंदना प्रकाश पवार  (राष्ट्रवादी) 
केंदूर गण 
 सुचिता थिटे  (राष्ट्रवादी) ,
वडगाव रासाई गण 
 विकास शेलार  राष्ट्रवादी 
मांडवगण फराटा गण 
संगीता फराटे  राष्ट्रवादी  
शिक्रापूर गण 
 रामभाऊ सासवडे (राष्ट्रवादी) ,
रांजणगाव सांडास गण 
विजय रणसिंग (राष्ट्रवादी) ,

अपक्ष पंचायत समिती सदस्य 
सणसवाडी गण 
 कोमल सत्यनारायण ढेरंगे  (अपक्ष )






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!