लोणीकंदचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन
शिरूर ( प्रतिनिधी )
लोणीकंद ता. हवेली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेले सर्जेराव शामराव कुंभार वय ५० वर्षे यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,
सर्जेराव कुंभार हे शनिवारी दिवसभर पोलीस स्टेशन मधील कर्तव्य बजावून रात्री दहा वाजता घरी गेले होते, दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मानवली, सर्जेराव कुंभार यांनी १२ ओक्टोबर २०२४ रोजी लोणीकंद पोलीस स्टेशनचा पदभार हाती घेतला होता, त्यांनतर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांनी त्यांच्या कार्याचा अनोखा ठसा उमटवला होता, तर एक जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्यदिन कार्यक्रमासावर्षे चोख कार्य पार पाडले होते, त्यांच्या मागे, आई, मोठा भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार असून त्यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील चावरे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
सोबत - सर्जेराव कुंभार यांचा फोटो.

