शिरूर-राजगुरुनगर मार्गावर आमदाबाद दुचाकी व चारचाकी वाहनाच्या धडकेत ३ वर्षीय चिमुकला ठार तर तीन गंभीर

9 Star News
0

 शिरूर-राजगुरुनगर मार्गावर आमदाबाद दुचाकी व चारचाकी वाहनाच्या धडकेत ३ वर्षीय चिमुकला ठार तर तीन गंभीर 


शिरूर प्रतिनिधी 

     शिरूर-राजगुरुनगर मार्गावर आमदाबाद ता.शिरूर माशेरे मळ्याजवळदुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात होऊन या अपघातात तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी चारचाकी वाहनाचा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     हा अपघात १६ फेब्रुवारी सोमवार दुपारी चारच्या सुमारास झाला आहे.

    विराज धीरज पवळे (वय 3 वर्ष रा. कोयाळी ता. खेड जि.पुणे) या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

    या अपघातात धिरज राजू पवळे (वय २४), वैभव धिरज पवळे (वय२१), गोपिका राजू पवळे (वय ४५ सर्व रा.रा.कोयाली ता. खेड जि.पुणे) हे तिघे जखमी झाले आहे.

    याप्रकरणी शिवम सत्यवाण साळवे (वय २८ रा. मलठण ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.तर संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई ता. शिरूर जि.पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आमदाबाद ता. शिरूर माजी तलाठी थोरात यांच्या घरासमोरील शिरूर-राजगुरुनगर मार्गावर दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान दुचाकी क्रमांक MH14 EZ 1239 आली असता 

 समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टोयाटो ग्लांजा

 कार MH12 XX2486 या दोन वाहनाची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून सर्व प्रवासी गंभीर अवस्थेत आढळून आले. यामध्ये विराज या तीन वर्षे चिमुकल्याचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले . फिर्यादीवरून चार चाकी वाहनाचे चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अरुण उबाळे करीत आहे.


दरम्यान, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याचमुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शिरूर-राजगुरुनगर मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!