शिरूर पुणे महामार्गावर बोऱ्हाडेमळा येथे दुचाकीचा अपघात ३७ वर्षीय युवकाचा मृत्यू

9 Star News
0

  शिरूर पुणे महामार्गावर बोऱ्हाडेमळा येथे दुचाकीचा अपघात ३७ वर्षीय युवकाचा मृत्यू 


शिरूर प्रतिनिधी 

     शिरूर पुणे महामार्गावर बोऱ्हाडेमळा येथे दुचाकीला अज्ञात व्यक्ती आडवा गेल्याने दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात ३७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे.

     विनोद संपत वर्पे (वय ३७ वर्षे,रा.बोऱ्हाडेमळा, शिरूर ता शिरूर) या अपघातात मयत झाले आहेत.

       याबाबत संदीप सुखदेव वर्पे (वय ४३ वर्षे, रा.बोऱ्हाडेमळा, शिरूर ता शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास विनोद संपत वर्पे हे शिरूर बाजूकडून बो-हाडे मळा येथे त्याचे ताब्यातील मोटार मायकलवरून येत असताना अचानक त्याचे मोटार सायकलला कोणीतरी अज्ञात व्यक्ती आडवा गेल्याने त्यामध्ये त्याची मोटार सायकल रोडवर स्लीप होवून त्यात रोडवर खाली पडून त्याचे डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे असे सांगितले त्यावेळी फिर्यादी यांनी विनोद संपत वर्पे याला कोळपे हॉस्पिटल शिरूर येथे औषध उपचाराकामी घेवून गेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वी मयत झाला असल्याचे सांगितले आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजीराव बनकर करीत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!