शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर श्रीगोंदा तालुक्याचे सीमेवर असणाऱ्या दाणेवाडी गावामध्ये माऊली सतीश गव्हाणे १९ वर्षीय तरुणाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली या घटनेने शिरूर श्रीगोंदा नगर पुणे जिल्हा व महाराष्ट्र हादरला आहे. या हत्येचा शोध लावणे पोलिसांपुढे आता मोठे आव्हान बनले आहे. खून करणारे आरोपींनी कुठलाही पुरावा मागे न ठेवल्याने पोलिसांची गुन्हे अन्वेषण विभाग पथक व पोलीस पथक या गुन्ह्याचा तपास कसा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मस्साजोग बीड याठिकाणी झालेल्या हत्येनंतर श्रीगोंदा तालुक्यात ही अतिशय क्रूरपणे झालेली हत्या आहे.
अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल उशिरा का होईना घेतली असून हा गुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशन कडून काढून घेऊन अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी दिला आहे .
या हत्येचे आरोपी शोधणे याबाबत महाराष्ट्र शासनाने लक्ष घालणं गरजेचे आहे गरजेचे आहे.
तर अठरा मार्च रोजी दाणेवाडी गाव व पंचक्रोशी पुणे नगर महामार्ग शिरूर जवळ गव्हाणेवाडी १७ कमानी पुलाजवळ १८ मार्च २५ रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
या माऊली सतीश गव्हाणे १९ वर्षीय कॉलेज तरुणाचा खून करताना आरोपींनी त्याचे दोन्ही हात पाय व मुंडके छाटले. धड एका पोत्यात तर पाय, हात, डोके एका पोत्यात असे दोन्ही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दानेवाडी नदीच्या बाजूला असणाऱ्या दोन जवळ असणाऱ्या विहिरींमध्ये टाकून दिले होते.
हा खून करणारे आरोपी मोठा शातीर असून, अतिशय शांतपणे या तरुणाचा खून करून त्याचे अवयव अत्याधुनिक कटरच्या साह्याने वेगवेगळे करताना निर्दयी पनाच कळस करत त्याचे कापून टाकले आहे. व जवळच असणाऱ्या दोन विहिरीमध्ये टाकून दिले आहे.
या मृत माऊली सतीश गव्हाणे या तरुणाबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे मिसिंगची फिर्याद दाखल आहे. याबाबत त्यांच्यात गावातील एका तरुणीने त्याला कॉलेज येते पाहिला असल्याचे म्हटले आहे. त्यावरून शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पथकाने शिरूर शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे संबंधित मुलीला घेऊन तपासले आहे. परंतु या तरुणाच्या कुठल्याही सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेला नाही. तर बारावीच्या परीक्षेसाठी तो गैरहजर असल्याचेही संबंधित कॉलेजने सांगितले असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले. तरीही या तरुणाबाबत काहीही माहिती भेटती का याबाबतची तपास शिरूर पोलीस स्टेशनही मिसिंग दाखल असल्यामुळे करत आहे.
तर हा तरुण ६ मार्च रात्री साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत घराच्या जवळ होता .त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. त्यामुळे आरोपी दाणेवाडी परिसरातीलच का? आणखी कुठले याबाबत पोलिसांना शंका असून, त्याच गावात मृतदेह आढळणे हेही आरोपींनी पोलिसांना तपासासाठी दिलेले आव्हानच आहे.
खून झालेल्या माऊली गव्हाणे यांच्या खुनाचा तपास अहमदनगर ग्रामीण व शहर गुन्हे अन्वेषण विभाग, श्रीगोंदा बेलवंडी पोलीस स्टेशन तपास पथक व पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग तपास पथक व आणखी तपास पथकाच्या तुकड्या अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे.
ज्या ठिकाणी माऊली गव्हाणे याचा मृतदेह सापडला आहे त्या ठिकाणी पोलीस पथकांच्या वतीने दोन वेळेस श्वान पथक आरोपींचा काही माग निघतो का यासाठी आणले आहे परंतु त्यात कुठलाही माग श्वानपथकाला लागलेला नाही.
आरोपी जवळचे का? आणखी कुठले याबाबत पोलिसांची तपास सूत्रे फिरत आहे.
तरी पोलीस पथक चोहोबाजूंनी या गुन्ह्याचा तपास करत असून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने तपासात काही दिशा मिळते का काही क्लू मिळतो का? याची पडताळणी करत आहे.
एकंदरीत पाहता या खुनाचा तपास लावणे अहिल्यानगर ,पुणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. परंतु "कानून के हात बडे लंबे होते है" या म्हणीप्रमाणे पोलीस या गुन्ह्याचा तपासापर्यंत जातील अशी आशा बाळगणे गरजेचे आहे.
दाणेवाडी येथील 19 वर्षीय तरुणाचा खूनाचा तपास अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे वर्ग केला आहे.
संतोष भंडारे ,पोलिस निरीक्षक, बेलवंडी अहिल्या
नगर.