रांजणगावात हॉटेल पुढील दुचाकी काढल्याने कामगाराला मारहाण ...कामगार व हॉटेल चालकाला मारहाण करून रक्कमही लांबवली

9 Star News
0

 रांजणगावात हॉटेल पुढील दुचाकी काढल्याने कामगाराला मारहाण ...कामगार व हॉटेल चालकाला मारहाण करून रक्कमही लांबवली 


शिरूर प्रतिनिधी 

 रांजणगाव गणपती ता. शिरूर येथील एका हॉटेल समोर लावलेली दुचाकी हॉटेल कामगाराने काढल्याने टोळक्याने हॉटेल कामगारांसह हॉटेल चालकांना मारहाण करून काउंटर मधील रक्कम लांबवल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अथर्व रावसाहेब शेळके, रोहन गणेश पंचमुख, अभी अनिल जगताप, निखिल चंद्रकांत खेडकर व अक्षय तीरखुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                                रांजणगाव गणपती ता. शिरूर येथील शेफ चायना टाऊन या हॉटेल समोर काही युवकांनी दुचाकी लावली होती मात्र हॉटेलला अडथळा होत असल्याने हॉटेल कामगार प्रणव बावनकर याने सदर दुचाकी बाजूला घेतली, दुचाकी बाजूला घेतल्याचा राग आल्याने काही वेळाने अथर्व शेळके, रोहन पंचमुखी यांसह काही युवकांनी एका कार व दुचाकीहून येऊन दुचाकी बाजूला का घेतले असे म्हणत हॉटेल कामगार प्रणव बावनकर याला मारहाण करण्यास सुरुवात केली, यावेळी हॉटेल चालक बाळू अभंग व त्यांचा मुलगा पराग अभंग हे दोघे कामगाराला वाचवण्यासाठी आले असता आलेल्या टोळक्याने त्या दोघांना देखील शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करत हॉटेल फोडून टाकू, तुमचे हॉटेल चालू देणार नाही अशी धमकी देत हॉटेलच्या काउंटर मधील 7000 रुपये रक्कम काढून घेऊन पोबारा केला, याबाबत संगीता बाळू अभंग वय 53 वर्षे रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अथर्व रावसाहेब शेळके, रोहन गणेश पंचमुख, अभी अनिल जगताप, निखिल चंद्रकांत खेडकर आणि अक्षय तीरखुंडे सर्व रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे हे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!