जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी लागणार निकाल

9 Star News
0

 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी लागणार निकाल 


शिरूर प्रतिनिधी 

       जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाढले असून दिनांक ५ फेब्रुवारी २६ रोजी या दोन्ही निवडणुकीसाठी मतदान होणार असून दिनांक ७ फेब्रुवारी २६ रोजी यायची मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. 

    त्यामुळे शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणामध्ये इच्छुकांची धाकधूक सुरू झाली आहे तर आता गुडघ्याला बाशिंग बांधून तिकीट मागण्यासाठी नेत्यांची उंबरटे भिजवणे आजपासून सुरू होणार आहे.

     जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पुढील प्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करणे 16 जानेवारी ते 21 जानेवारी, उमेदवारी अर्ज छाननी 22 जानेवारी, उमेदवारी अर्ज मागे घेणे 27 जानेवारी, उमेदवार चिन्ह वाटप 27 जानेवारी, या निवडणुकीसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     जिल्हा परिषद पंचायत समिती

गण निहाय आरक्षण पुढील प्रमाणे 

वडगाव रासाई अनुसूचित जाती 

मांडवगण फराटा ओबीसी महिला 

शिरूर ग्रामीण ओबीसी महिला 

न्हावरे सर्वसाधारण 

पाबळ ओबीसी 

केंदूर सर्वसाधारण महिला 

कवठे यमाई सर्वसाधारण महिला 

टाकळी हाजी ओबीसी महिला 

तळेगाव ढमढेरे सर्वसाधारण महिला 

रांजणगाव सांडस सर्वसाधारण 

शिक्रापूर सर्वसाधारण  

सणसवाडी सर्वसाधारण महिला 

रांजणगाव गणपती सर्वसाधारण 

कारेगाव सर्वसाधारण 


जिल्हा परिषद गट आरक्षण २०२५


1. वडगाव रासाई-मांडवगण फराटा-इतर मागासवर्ग सर्वसाधारण

2. टाकळीहाजी कवठे यमाई- सर्वसाधारण पुरुष

3. शिरूर ग्रामीण न्हावरे - इतर मागासवर्ग (OBC) महिला

4. रांजणगाव गणपती-कारेगाव - सर्वसाधारण महिला

5. केंदुर-पाबळ - सर्वसाधारण पुरुष

6. शिक्रापूर-सणसवाडी - सर्वसाधरण महिला

7. तळेगाव ढमढरे-रांजणगाव सांडस - सर्वसाधारण महिला

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख: 16 जानेवारी 2026

उमेदवारी अर्ज छाणणीची तारीख: 22 जानेवारी 2026

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख: 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत

निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी: 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत

मतदानाची तारीख: 5 फेब्रुवारी 2026 (सकाळी 7.30 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत)

निकालाची तारीख: 7 फेब्रुवारी 2026 (सकाळी 10 पासून)

        सुचना शिरूर नगर परिषद 

*🔴शिरूर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, जलशुद्धीकरण केंद्र येथील नियोजित स्वच्छता / मेंटेनन्स करण्यासाठी गुरूवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी शिरूर शहरातील पाणीपुरवठा बंद राहील.*


*शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी 2026 पासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे ही विनंती.*

*- शिरूर नगरपरिषद, घोडनदी*


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!