निमोणे ता. शिरूर येथे वाढदिवसाला न बोलावल्याने घरच पेटवले
शिरूर प्रतिनिधी
वाढदिवसाला बोलावले नाही, या रागातून
निमोणे (ता. शिरूर) येथील ज्ञानदेव चंदर काळे या शेतकऱ्याचे घर माथेफिरू तरुणाने पेटवून दिले. या आगीत घर पूर्णतः बेचिराख झाले असून, रोख पैसे, दागिने, कपडे, असे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत निखिल ज्ञानदेव काळे (रा. निमोणे, भोसवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.
अक्षय संतोष वाळुंज (रा. शिंदोडी, ता. शिरूर) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती पुढीलप्रमाणे
निखिल काळे याच्या वाढदिवसाला अक्षय वाळुंज या तरुणाला बोलावले नाही. त्यावरून त्यांच्यात चार दिवसांपूर्वी बाचाबाची झाली. याचाच राग अक्षय याच्या मनात होता. त्यातून अक्षय याने रविवारी (ता. ४) पहाटेआग कोणी व का लावली, हे शोधण्यासाठी संशयावरून या परीसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अक्षय हा त्याच्या मोटारसायकलवरून फिरत असल्याचे निष्पन्न झाले. वाढदिवसाला बोलावले नाही म्हणून अक्षय याचा निखिल याच्यावर राग होता. त्याचा बदला घेण्याची भाषा तो वारंवार करत होता.तीन वाजता निखिल यांच्या झोपडीवजा घरावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. सुदैवाने आगीच्या उजेडाने वेळीच जागे झालेल्या काळे कुटुंबीयांनी घराबाहेर पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला.दरम्यान, घटनेनंतर अक्षय वाळुंज फरारी झाला असून, पोलिस त्याच्या शोधावर आहेत.
यासंदर्भात पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहायक निरीक्षक गोविंद खटिंग अधिक तपास करत आहेत.

