शिरूर येथील मातोश्री मदन बाई धारिवाल हॉस्पिटल व रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने पत्रकार दिना निमित्त आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकारांचा सन्मान
शिरूर दिनांक प्रतिनिधी
येथील मातोश्री मदन बाई धारिवाल हॉस्पिटल व रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने पत्रकार दिना निमित्त आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकारांचा सन्मान करीत शुभेच्छा देऊन पत्रकार दीन साजरा करण्यात आला.
शिरुर रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जाँभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बाराहाते, शहराध्यक्ष दिपाली काळे, माजी तालुकाध्यक्ष प्रवीण गायकवाड, अभिजीत आंबेकर, सतीश धुमाळ,पत्रकार संघाचे प्रदेशचे अनिल सोनवणे,मुकूंद ढोबळे, संवाद वाहिनीचे संपादक मदन काळे, पोपट पाचंगे, धर्मा मैड, सुदर्शन दरेकर,उपस्थीत होते.
बदलत्या तंत्रज्ञानानुसार पत्रकारांनी विविध कौशल्य आत्मसात करावी.पत्रकारांनी आपल्या व्यस्त व धगाधगीचा आयुष्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले.
यावेळी रुबी हॉल क्लिनिक च्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी लवकरच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची डेप्युटी जनरल मॅनेजर डॉ. संजीव तांदळे यांनी सांगितले.
तर हृदयरोग प्रमुख यांनी हृदयरोगासंबंधीत घ्यावयाची काळजी व त्यासाठी 90 मिनिटाचा गोल्डन टाईम याबाबतची माहिती पत्रकारांना हृदयरोग तज्ञ डॉ. मयूर तायडे यांनी समजून सांगितले.
तर ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. व्यंकटेश सोनकवडे यांनी हाडांचे आजार व विकार यांच्याबाबत कशी काळजी घ्यायची व यावर नवीन तंत्रज्ञान उपाय आल्याने माणसाचे जीवन सुकर झाल्याचे सांगितले.
तर फॅमिली फिजिशियन डॉ. गौरव शिंदे यांनी सांगितले की जो आजार झाला त्यावर योग्य औषध उपचार घेतल्यास कुठलेही साईड इफेक्ट होत नसल्याचे सांगितले.
आरएमडी फाउंडेशनचे संचालित धारिवाल हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक शिरूर येथील डेप्युटी जनरल मॅनेजर डॉ. संजीव तांदळे डॉ. मयूर तायडे(हृदयरोगतज्ञ) डॉ.विशाल पानशेवडेकर (जनरल सर्जन) डॉ. व्यंकटेश सोनकवडे (ऑर्थोपेडिक सर्जन) डॉ. गौरव शिंदे (फॅमिली फिजिशियन) व तसेच हॉस्पिटलचे युनिट हेड मायकेल पॉल हे उपस्थित होते.
सूत्रसंचालन व प्रास्तविक प्रा. सतीश धुमाळ यांनी तर आभार संजय बारहाते यांनी मानले.

