शिरुरमध्ये बाजारात आलेल्या महिलेचे गंठण लांबवले
शिरूर ( प्रतिनिधी )
शिरुर शहरातील मार्केट यार्ड मध्ये वहिनीसोबत बाजारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले असल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर शहरातील संगीता निर्वाण या त्यांच्या वहिनी संपदा वेताळ यांच्या सोबत दुपारच्या सुमारास मार्केट यार्ड मध्ये बाजार खरेदी करण्यासाठी आलेल्या असताना अज्ञात व्यक्तीने संगीता यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे मिनी गंठण लांबवले, याबाबत संगीता राजाराम निर्वाण वय ४८ वर्षे सध्या रा. कामाठीपुरा शिरुर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चितळसर मानपाडा ठाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर हे करत आहे.
शिरूर बाजार समिती येथे मोठ्या प्रमाणात शनिवारी आठवडे बाजार भरत असून ही जागा अतिशय कमी असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत आहे या गर्दीचा फटका शहरातील वाहतूक कोंडीला होत आहे.तर मोबाईल चोर व गंठण चोर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हैदोत घालत आहे. तरी शहरातील आठवडे बाजार दुसरीकडे हलवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

