शिरूर शहराच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेणार

9 Star News
0

 


शिरूर दिनांक प्रतिनिधी 

         शिरूर नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदाचा पदभार नवनिर्वाचित नगरध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी स्वीकारला.

      यावेळी प्रसिद्ध उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल, शिरूर चे आमदार यांच्या पत्नी मनीषा ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे,पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, थेऊर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र काळे, शरद कालेवार, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा पदभार नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी स्वीकारला तर यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते

        यावेळी बोलताना प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल म्हणाले नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे व नगरसेवक यांनी शिरूर शहराचा विकास करताना कुठलेही राजकारण पक्षभेद आणू नये आपण सर्वजण शिरूर शहराचेच नागरिक आहोत हे प्रथम ध्यानात घेऊन शहराचा विकास करावा असा सल्लाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांना दिला.

         यावेळी बोलताना माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांना सर्व शिरूरकरांनी निवडून दिले आहे शिरूर चा विकास हाच प्रमुख मुद्दा ध्यानात ठेवून शहराच्या विकासाला चालना द्यावी त्यासाठी लागणारा निधी राज्य शासन व केंद्र शासन यांच्या मदतीने आमदार ज्ञानेश्वर कटके व मी स्वतः निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून लवकरच म्हाडाच्यावतीने शिरूर शहरातील चार एकर जागेमध्ये मोठी घरकुल योजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

        शिरूर शहराचा विकास करताना सर्व लहान मोठ्यांचे मार्गदर्शन घेऊ शहरातील दर्जेदार रस्ते, चांगल्या आरोग्याच्या सोयी, शहराची स्वच्छता , झोपडपट्टी पुनर्वसन हा प्रमुख मुद्दा घेऊन शहराचा उच्च दर्जाचा विकास करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी देऊन सर्वांना बरोबर घेऊन हा विकास साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!