शिरूर आनंद सोसायटी मध्ये बंगल्याचे गज तोडून लाखोंचे दागिने चोरी
शिरूर ( प्रतिनिधी ) शिरुर शहरातील रामलिंग रोड आनंद सोसायटी येथे एका कापड व्यवसायिकाच्या बंगल्याच्या खिडकीचे गज तोडून बंगल्यातील लाखोंचे दागिने व रोख रक्कम असा साडे तीन लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर येथील राम रिंग रामलिंग रोड लगत असलेल्या आनंद सोसायटी मधील कापड व्यवसायिक रवींद्र कोठारी हे रात्रीच्या सुमारास जेवण खाऊन करून झोपलेले असताना सकाळच्या सुमारास कुटुंबीय उठले असता त्यांना बंगल्यातील काही साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी बंगल्यात पाहणी केली असता बंगल्याच्या पाठीमागील खिडकीचे सात ते आठ गज तुटल्याचे दिसून आल्याने कोठारी यांनी बंगल्यातील कपाटांची पाहणी केली असता कपाटातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे तसेच पाऊण किलो वजनाचे चांदीचे दागिने व बावीस हजार रुपये रोख रक्कम असा तब्बल तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले, याबाबत रवींद्र मोहनलाल कोठारी वय ६२ वर्षे रा. आनंद सोसायटी रामलिंग रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व नीरज पिसाळ हे करत आहे
.

