शिरूर शहरातील जोशीवाडी परिसरात बिबट्याचा वावर..नागरिकांनी सावध राहावे...
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील जोशीवाडी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असून येथील नागरिकांनी रात्री व दिवसा फिरताना काळजी घ्यावी असे आव्हान शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.
काल २० जानेवारी रात्री 11.30 सुमारास जोशेवाडी, शिरूर येथे बिबट दिसल्याची माहिती कळताच वन विभाग शिरूर यांनी याभागात सर्च ऑपरेशन (search operation )सुरु केले. मानवी वस्ती मध्ये अनेक घरे असून अरुंद बोळी असल्याने बिबट दिसणे कठीण जात होते. बिबट्या दिसल्यावर त्याला हुसकावत नदीच्या दिशेने पाठविण्यात सकाळी 6 वाजता यश आले आहे.
सध्या पांजरपोळ परिसरात 1 पिंजरा लावलेला असून आज 2 अधिकचे पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच ड्रोन द्वारे पाहणी करण्यात येणार आहे.
या search operation मध्ये निळकंठ गव्हाणे, वनपरीक्षेत्र अधिकारी शिरूर, वनरक्षक गणेश झिरपे, वनरक्षक जालिंदर सानप, वनपरीक्षेत्रातील इतर कर्मचारी, बेस कॅम्प मेंबर आणि तसेच माणिकडोहचे डॉ. विसळकर आणि त्यांची टीम सहभागी होते.
तसेच या भागातील हिंगणी याकडे मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळीच नागरिक फिरण्यासाठी जात आहेत तर शाळकरीमुले याच रस्त्याने शाळेमध्ये जात आहे तर या भागातील जोशी वाडी व पाचर्णे मळा येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे काही दिवसापूर्वी या भागात बिबट्याचा वावर होता. परंतु आता पुन्हा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, बिबट दिसल्यास तात्काळ वन विभागास संपर्क करावा. संध्याकाळी विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर पडताना सावधगिरी बाळगा. लहान मुलांची काळजी घ्यावी. रात्री त्यांना बाहेर एकटे सोडू नये. घरासमोर उजेड ठेवा.
निळकंठ गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर

