शिरूर तालुक्यात लाच घेताना महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यास पकडले

9 Star News
0

 शिरूर तालुक्यात लाच घेताना महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यास पकडले


शिरूर प्रतिनिधी (प्रतिनिधी) शेतजमिनीच्या पंचनाम्याच्या कामासाठी लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी महिलेस ७ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे ही कारवाई करण्यात आली.

ग्राम महसूल अधिकारी प्रमिला नागेश वानखेडे (वय ४२) असे कारवाई करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत ५६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांची शिरसगाव

काटा येथे वडिलोपार्जित जमीन आहे. वडिलांनी तोंडी वाटप करून दिलेल्या त्यांच्या हिश्श्याच्या शेतजमिनीची लेव्हल करत असताना भावासोबत वाद झाला होता. त्यानंतर ९ जानेवारी रोजी तलाठी कार्यालयाकडून शेताचा पंचनामा करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. १२ जानेवारी रोजी तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले असता, आरोपी लोकसेविका वानखेडे यांनी 'तुमच्या बाजूने पंचनामा करून देण्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील,' अशी थेट लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता, तडजोडीअंती लाचेची रक्कम ७ हजार रुपये निश्चित करण्यात आली. त्याच दिवशी छत्रपती संभाजीराजे चौक, नाव्हरा-तळेगाव रोड येथे सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष तक्रारदाराकडून ७ हजार रुपये स्वीकारताना अधिकारी महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!