शिरूर नगर परिषद विरोधात मनसे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू

9 Star News
0

 

 शिरूर नगर परिषद विरोधात मनसे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू 


शिरूर प्रतिनिधी 

      शिरूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणनगरपरिषद कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देणे सेंटर शाळा परिसरात झालेले फुटपाथ वरील अतिक्रमण काढावे यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी नगरपरिषदे विरोधात शिरूर नगरपरिषद कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशी हे उपोषण सुरू आहे.

     शिरूर शहरातील अनेक प्रमुख मागण्यासाठी मनसे पक्षाच्या वतीने विविध आंदोलन आमरण उपोषण करूनही नगरपरिषद दुर्लक्ष करीत असून यासाठी आता आजपासून आमरण उपोषण सुरू केले असल्याचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद यांनी सांगितले.

      या उपोषणाला माधव सेनेचे अध्यक्ष रवींद्र सानप, प्रवासी संघटनेचे प्रमुख अनिल बांडे, मेजर नारायण पाचंगे, मनसे शहराध्यक्ष ॲड.आदित्य मैड, संदीप कडेकर गोपीनाथ पठारे उपस्थित होते.

शिरुर नगरपरिषद मालकीचे भंगार साहीत्य विल्हेवाट प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करणे बाबत. घनकचरा प्रक्रिया शास्त्रोक्त पध्द्तीने न होता बिले काढणाऱ्या स्वच्छता निरीक्षकाची विभागीय चौकशी करणेबाबत.

 ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब न करता करण्यात आलेली गंभीर अनियमितता व त्यामुळे झालेली नगरपरिषदेची करोडो रुपयांची लुट . सांडपाणी व मलः निस्सारण प्रकल्प तात्काळ चालु करुन घोडनदी पात्रातील पर्यावरणाची हानी थांबविण्याची कार्यवाही करावी. शहरातील फुटपाथवर झालेले टपरी धारकांचे अतिक्रमण. जिओ कंपनीने फुटपाथमध्ये उभारलेले बेकायदेशीर खांब व त्यामुळे नागरिकांची कुचंबना.

पुररेषेतील अतीक्रमणे व नैसर्गीक नाल्यावरील अनाधिकृत बांधकामे काढणे बाबत इत्यादी. सार्वजनिक डांबरी रस्ता खोदाई प्रकरणी टोरंटो गॅस प्रा. लि. कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन शासन निर्णया नुसार दंड वसुल करणे बाबत.शिरूर शहरातील रस्त्यांच्या कामाची चौकशी करणेबाबत.

 मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेतील भ्रष्टाचार व कुरता , नगरपालिकेतील सफाई कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळणेबाबत. सफाई कर्मचाऱ्याच्च्या झालेल्या व्हायरल क्लिप संदर्भात स्वच्छता निरीक्षकावर कारवाई होण्याबाबत. शिरुर नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदयानुसार वेतन मिळणे बाबत.

या तेरा मागण्या करण्यात आल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!