शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून शेळ्या चोरणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक - महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक

9 Star News
0

 शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून शेळ्या चोरणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक - महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक


शिरूर प्रतिनिधी 

       शिरूर तालुक्यातील शेतक-यांचे शेळी व बोकडे चोरणारे दोन चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी केली अटक, केली असून त्याच्याकडून चोरी झालेले शेळी- बोकडे शेतक-यांना परत देण्यास यश आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे तर आरोपीकडून एकूण ५ गुन्हे उघडकिस आणले आहेत .

       याप्रकरणी गणेश कैलास ब्राम्हणे (वय 21) सुनिल अण्णाभाउ माळी (वय 24 दोन्ही रा गव्हाणवाडी, संतोष रिकामे यांचे विटभट्टी जवळ ता. श्रिगोंदा जि अहिल्यानगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा व वाघाळे येथून शेतक-यांचे शेळी व बोकड हे मोटार सायकल वरुन येणारे दोन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले बाबत घटणा घडल्या होत्या, त्यावरून माणिक रामभाऊ काळे (रा बाभुळसर खुर्द ता शिरुर जि पुणे) यानी दिलेल्या फिर्यादी तरुन बोकड चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशाच प्रकारे इतर शेतक-यांच्या शेळ्या व बोकडे हे चोरीस गेले बाबत माहीती मिळाल्यावर एकुण 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

     सदर गुन्ह्यात शेतक-यांचे शेळी व बोकडे चोरी होत असल्याने पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी गुन्हा उघडकिस आणण्याचे दृष्टिने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनव्या तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अमंलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड किस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.

    रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनवे तपास पथका कडुन दोन अज्ञात चोरट्याचा शोध सुरु होता, तपास पथकाने शिरुर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातिल 150 पेक्षा जास्त सीसीटिव्ही तपासुन व तांत्रिक विश्लेषनात्ते अधारे आरोपींचा शोध येणे सुरु असताना पोलीस अंमलतार योगेश गुंड यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि. अहिल्यानगर येथिल दोघे जण मोटार सायकल वर येऊन शेळी व बोकडे चोरून घेऊन जात असले बाबत माहिती मिळाली, तसेच तांत्रिक विश्लेषना चे आधारे गुन्ह्यातील अज्ञात चोरटे हे त्याच भागात जात असल्याचे निष्पन्न झाल्याने संजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने आरोपी गणेश कैलास ब्राम्हणे, सुनिल अण्णाभाऊ माळी यांना गव्हाणवाडी परिसरातुन अटक केली. तपासात आरोपींनी बाभुळसर खुर्द, कर्डिलवाडी, वाघाळे, गणेगाव खालसा, व शिरूर तालुका परिसरातुन शेतक-यांचे वरिल बोकड व शेळ्या चोरल्याची कबुली दिली. आरोपी कडुन चोरी केलेले ५ बोकडे ,१ शेळी तसेच गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल व असा एकुण १ लाख १५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात पोलीस पथकास यश आलेले आहे, सदर आरोपी यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ५ गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे, 

     तपासात आरोपीकडून ताब्यात घेतलेले शेळी व बोकड शेतक-यांना परत मिळालेले शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

        ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, यांचे मार्गदर्शना खाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, नितिन भोस, संदिप जगदाळे, रामेश्वर वाहेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार नितिन भोस, संदिप जगदाळे, नितेश हुडे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!